Monday, 14 March 2022

भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट ( रजि.) आयोजित वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न !

भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट ( रजि.) आयोजित वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न !


मुंबई, दिपक कारकर :

प्रत्येक कार्यात प्रत्येकालाच सिंहाचा वाटा उचलता येणे शक्य नसतं; परंतू आपल्यापरीने त्यात सामील होत खारूताईचा वाटा घेणे शक्य असते. या उक्तीला अनुसरून गेली अनेक वर्षे भागोजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजशील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही उपरोक्त संस्थेतर्फे रविवार दि. १३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ०४ ते ०७ या वेळेत देवाडीगा हॉल, ७० A - हिंदतेज बिल्डिंग,दादासाहेब फाळके मार्ग,दादर (पूर्व) येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सध्याच्या कोरोनाकाळानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा उमगाव्या म्हणून अनुकूल क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे म्हणून कौशल्याचार्य  राष्ट्रीय पूरस्कार सन्मानित सुभाष कोलापटे सर यांच्याकडून उपस्थित विद्यार्थी व सभागृहाला प्रेरणादायी अचूक मार्गदर्शन मिळाले. आजूबाजूला अनेक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांना निवडून त्यांचा गौरव करणारा पुरस्कार सोहळा तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मुरब्बी मंडळीसह स्नेहमेळावा असा मोजका परंतू नेटका कार्यक्रम उपरोक्त ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही नियोजनबद्ध साजरा झाला.

यामध्ये कथ्थकगुरू अशोक आखाडे सर,वेटलिफ्टिंगपटू बबन झोरे, कॅरमपटू आरती ढवण,पत्रकार दीपक कारकर तसेच श्रीमानयोगी सेवा परिवार यांना त्यांच्या क्षेत्रातील कौतुकास्पद कामगिरीमुळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा. ज्येष्ठ समाजनेते राजूसाहेब जांगळे, PSI ज्ञानेश येडगे, रामभाऊ खरात, पांडुरंग शेळके, सचिन हुंबे,प्रकाश देसाई, गणपत वरक आदी मान्यवर होते. 
कार्यक्रमाच्या समारोपाला ट्रस्टचे सचिव श्री.अनंत देसाई यांनी सर्व उपस्थितांचे, पुरस्कार्थी आणि मान्यवरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...