डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक नाही ! निषेधार्थ भाजपचे पोलीस ठाण्याबाहेर उपोषण !!
डोंबिवली, हेमंत रोकडे : भाजपचे सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी मनोज कटके यांच्यावर गेल्या महिन्यात अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. त्याला १५ दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हल्ला झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याची भेट घेतली होती. आणि या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र त्यांनतर या प्रकरणाचा तपास पुढे गेला नसल्याने आम्ही संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
भाजप करणार असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्याबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या परिसरात उपोषणाला बसण्यास परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला. त्यामूळे पोलीस ठाण्याबाहेर असणाऱ्या फुटपाथवर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली.

No comments:
Post a Comment