कल्याण, आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये बेटी बचाव -बेटी पढाओ चा संदेश देत 'बाबुराव मस्तानी'' नाटकाच्या प्रयोगाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!
*महिला दिनाचे औचित्य साधत स्फूर्ती फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम*
कल्याण, बातमीदार : कल्याण मध्ये आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश देत बाबुराव मस्तानी नाटकाचा प्रयोगला महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कलाकारांनी सादर केलेली कला, प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळून ठेवत, वेळोवेळी विनोदी धमाल करत टाळ्यांची थाप कलाकारांना प्रेक्षकांकडून मिळत होती.
ऋणानुबंध कलाविष्कार निर्मित सौ. चारुशीला ठोसर निर्माती, लेखक बबन गायकवाड, दिग्दर्शक संजय कसबेकर, पार्श्वसंगीत दादा परस नाईक, ढोलकी स्वप्निल सुभेदार, रंगभूषा अनंत मोरे, प्रकाश /ध्वनी भाई सावंत, नृत्य संतोष आंब्रे, निर्माती चारूशीला अनिल ठोसर, कलाकार यशवंत शिंदे, सुप्रिया गावकर, राजू नाकती, किरण पाटील, सचिन माधव, नमिता पाटील कलाकारांनी अतिशय सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवत महिला वर्गाने नाटकाचा आनंद लुटला..
*कार्यक्रमाला स्फूर्ती फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्रयोग संपल्यानंतर सर्व कलाकारांचा स्फूर्ती फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर म्हणाले कोरोनाच्या मागील दोन- तीन वर्षांमधील बंदिवासातून बाहेर पडल्यानंतर पूर्णपणे रीफ्रेश करणारं असं नाटक होतं.
मागील दोन-तीन वर्षांमध्ये जेवढे हसलो नाही तेवढा आज हसलो, त्याचबरोबर कलाकारांनी केली मेहनत व सादरीकरण अफलातून होते, अशी नाटके वेळोवेळी होत राहिली पाहिजे आणि प्रेक्षकांनी कोणताही विचार न करता त्यांच्या कलेला त्यांच्या मेहनतीला आपण सर्वांनी दाद देत नाट्यगृहकडे आले पाहिजे इतरांना हि याबाबत जागृती केली पाहिजे भविष्यात आम्ही स्फूर्ती फाउंडेशन च्या माध्यमातून प्रेक्षक कसे नाटक पाहण्यासाठी कसे पोचतील यासाठी नेहमीच आणि विशेष प्रयत्न करत राहू असे ते शेवटीं म्हणाले* या प्रयोगाला स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष, भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष- बजरंग शांताराम तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन विश्वस्त शिल्पा तांगडकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी, रंजना माने, वैशाली परदेशी, उषा देसले, शारदा तांगडकर,भक्ती साळवी, सुनिता भागवत, सारिका बोरचाटे, संतोष बोरचाटे, प्रिया बोराटे, अरूणा बनसोडे, प्रशांत जावडेकर, टीकम, अनिता देशपांडे, सोनाली भरणे, कुंदा चंदने, प्रमिला सावंत, आशा विसपुते, वर्षा शुक्ला, ज्योती कट्टी, राजश्री जगताप, नीलम सावंत, वैशाली भवर, सुरेखा शिंगोटे, विजया आरोटे, चेतना पवार, शिल्पा देशपांडे, अरुणा पानसरे, श्रावणी पाठक सह स्फूर्ती फाउंडेशन सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:
Post a Comment