Saturday, 26 March 2022

विधवा, निराधार, घटस्फोटित, अपंग, घर कामगार व आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना बनवणार आत्मनिर्भर- सौ. सुवर्णाताई कानवडे (शेळके)

विधवा, निराधार, घटस्फोटित, अपंग, घर कामगार व आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना बनवणार आत्मनिर्भर- सौ. सुवर्णाताई कानवडे (शेळके)

"महिलांनी व्यवसाय करून व्हावे स्वावलंबी"


कल्याण, बातमीदार :  स्वत: संघर्ष करत तालुक्याच्या दुर्गम भागातील शेकडो घर कामगार विधवा, निराधार व प्रगतीच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या महिलांच्या आयुष्यात सोनेरी पहाट आणली आहे. 

स्वतः अडचणीत असताना, प्रगतीचा एकाकी संघर्ष सुरू असताना अडचणीतील महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी, यशस्वी व्यावसायिक घडविण्यासाठी शहरी  भागातील एखाद्या महिलेने झोकून देणे, अथक परिश्रम व झळ सोसून शेकडो महिलांना यशोशिखरावर पोचवणे हाच माझा ध्यास आहे.

कामगारांच्या मुली, आदिवासी महिला, विधवा, शालेय मुली यांना एकात्मिक आदिवासी विभाग, क्रीडा मंत्रालय, ग्रामविकास, नगरविकास, महिला व बालविकास, या विभागाच्या महिलांसाठीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आणि त्यातून महिलांना स्वावलंबी, सक्षम व यशस्वी व्यावसायिक बनविण्यात यशस्वी होत आहेत. संस्थेकडे वेगवेगळे कोर्स करण्यासाठी येणाऱ्या महिला प्रामुख्याने विधवा, शिक्षण अर्धवट राहिलेल्या, कौटुंबिक व आर्थिक अडचणीग्रस्त असायच्या. त्यांच्याकडे फी भरण्यासाठीही पुरेसे पैसे नसायचे. तरीही कमी फी, सवलत व प्रसंगी मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारीत करण्यात आले. ब्युटीपार्लर व लहान मुलांचे नर्सरी स्कूल सुरू केले. ब्युटीपार्लर सुरू झाल्यानंतर महिलांकडून ब्युटीपार्लर, शिवणकाम अशा अभ्यासक्रमांची विचारणा होऊ लागली.

महिलांपैकी बहुतेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्याची तयारी दाखवली. त्यात दुकान टाकणे (३० टक्के), लघु उद्योग (२९ टक्के), शेतीपूरक व्यवसाय (१९ टक्के), शिवणकाम (२० टक्के) करण्यासाठी त्या महिला तयार आहेत पण त्यातील ७५ टक्के महिलांना कर्ज आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने व्यक्तिगत स्तरावर कर्जाच्या योजना अतिशय कमी असल्याने त्यात बँकेच्या अनेक अडचणी त्यांना येत आहेत. 

महिलांना संभाषण कला जन्मताच अवगत असल्याने तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व व्यवसाय करण्यास अनुकूल असल्याने महिलांनी व्यवसायाकडे वळावे, त्यांच्यात असलेल्या उपजतच गुणांमुळे त्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होतात, त्यामुळे महिलांनी व्यवसायात येऊन स्वावलंबी व्हावे ह्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका संघटक डॉ. आदर्श भालेराव द्वारे कल्याण तालुक्यात महिला उद्योग कर्ज मार्गदर्शन मोहीम राबवण्यात येत आहे ज्यात महिलांनी स्वतःचे व्यवसाय कसे सुरू करावे यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जातात.  असे मत मिशन महाराष्ट्र नारी शक्ती चे ठाणे जिल्हा संघटिका सौ सुवर्णाताई कानवडे (शेळके) यांनी व्यक्त केले.

सौ. सुवर्णाताई कानवडे (शेळके) 📞 8928765351

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...