Tuesday, 22 March 2022

महाराष्ट्रातील सार्वजनीक ठिकाणे जेथे महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असलेले बस स्थानक, चौक, पार्क आशा ठीकणी ('छत्रपती शिवाजी महाराज') असे नामकरण करावे. *अजित संचेती, महासचिव, भारतीय राष्ट्रवादी पार्टी*

महाराष्ट्रातील सार्वजनीक ठिकाणे जेथे महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असलेले बस स्थानक, चौक, पार्क आशा ठीकणी ('छत्रपती शिवाजी महाराज') असे नामकरण करावे. *अजित संचेती, महासचिव, भारतीय राष्ट्रवादी पार्टी*


पुणे, बातमीदार : महाराष्ट्रातील सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा.१) 'छत्रपती शिवाजी महाराज नगर, बस्थांनक, पुणे, उदा.२) 'छत्रपती शिवाजी महाराज नगर, रेल्वे स्थानक, पुणे ) बाबत महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे स्थान आहे हे आपणांस माहित आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठया चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो किंवा केंद्रिय रवीशंकर प्रसाद असो.

आशा प्रकारावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर आदेश द्यावेत व नामकरण करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, पर्यटनमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त यांच्या कडे भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव अजित संचेती यांनी आज आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज निवेदना द्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...