10/ई प्रभागातील तळ +7 मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर तसेच अ प्रभागातील अनधिकृत 39जोत्यांच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई !
कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार 10/ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी मौजे नांदीवली तर्फ पंचानंद, डोंबिवली पूर्व येथील युनियन बँक ते रवीकिरण सोसायटी, डीपी रोडला बाधित होणा-या, जागामालक सचिन साबळे, बांधकामधारक अविनाश जागुष्टे यांच्या तळ+7 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली.
सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी , मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1पोकलेन, 5 कॉम्प्रेसरच्या सहाय्याने करण्यात करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे 1/अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी बल्याणी, उंबर्णी येथील 16 जोते निष्कासनाची धडक कारवाई आज केली.त्याचप्रमाणे टिटवाळा येथील घर आंगण सोसायटीच्या मागील 13 जोते व गणेशवाडी येथील 10 जोते सदर ठिकाणी बांधकाम सुरू होण्यापूर्वीच निष्कासित करण्याची कारवाई देखील 1 जेसीबीच्या सहाय्याने व महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी वर्ग व महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.



No comments:
Post a Comment