Tuesday, 22 March 2022

कल्याण मध्ये १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटीची फसवणूक करणाऱ्या संचालिकेला औरंगाबाद येथून अटक, कल्याण-- कोळसेवाडी पोलिसांची कामगिरी

कल्याण मध्ये १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटीची फसवणूक करणाऱ्या संचालिकेला औरंगाबाद येथून अटक, कल्याण-- कोळसेवाडी पोलिसांची कामगिरी


भिवंडी, दिं,२२, अरुण पाटील (कोपर) : फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी कल्याण -कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तीन वर्षापूर्वी सरोदे दांपत्यविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोन वर्षापासून फरार आरोपीचा शोध घेवून पोलिसांनी त्यांना अटक  केली आहे. 

आमच्या वित्तीय संस्थेत गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदाराला वाढीव व्याज दिले जाईल असे खोटे आमिष गुंतवणूकदारांना दाखवुन १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थेच्या संचालिकेला कोळसेवाडी पोलिसांनी औरंगाबाद येथून सोमवारी अटक केली. मनीषा सरोदे अटक केलेल्या संचालिकेचे नाव आहे. या महिलेची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे, पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्व भागात सुनील सरोदे आणि त्यांची पत्नी मनीषा सरोदे यांनी अल्टा लाईक केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि यु एल सी प्रायव्हेट लिमिटेड गोट फार्मिंग एग्रो सर्विसेस या दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदारांना वाढीव व्याज दिले जाईल, असे खोटे आश्वासन सरोदे पती-पत्नीने रहिवाशांना दिले होते. 

त्यांचा विश्वास संपादन करून कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील १०५ गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांपासून ते पुढे मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूका या दाम्पत्याने स्वीकारल्या. गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी आकर्षक परतावा दिला. नंतर परतावा देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरू केली. अनेक ग्राहकांनी मूळ रक्कम परत मागितली, ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ग्राहकांच्या संपर्कला प्रतिसाद देणे सरोदे पती-पत्नीने बंद केले. कल्याण पूर्व येथील कंपनीचे कार्यालय एक दिवस बंद पडले. व सरोदे पती पत्नी फरार झाले. त्यामुळे भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाणे गाठल्याने कल्याण -कोळसेवाडी पोलिसांनी हि कारवाई केली.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...