छ. शिवराय सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते.. संजीव सोनवणे
चोपडा, बातमीदार.. छत्रपती शिवरायांवर ख्यातनाम व्याख्याते संजीव सोनवणे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक शाखा तर्फे चोपडा शहरात काल रोजी रात्री आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते त्यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले की, छत्रपती शिवराय सामान्य जनतेचे राजे तर होतेच त्याबरोबर त्याचे जी वाला जीव देणारे मुस्तफा जमाल, मदारी मेहतर, आरमार प्रमुख, दौलतखान, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान असे नामवंत मुस्लिम सहकारीही होते. ते सर्व धर्म समभाव ठेवणारे राजे होते याचा आवर्जून उल्लेख केला या व्याख्यानाला ५०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते त्यात मनसे चे चोपडा तालुका अध्यक्ष कल्पेश खैरनार, माजी नगरसेवक अनिल वानखेडे ॲड धर्मेंद्र सोनार, पुंडलिक महाजन, निलेश बारी, तालुका उपाध्यक्ष विपीन बाविस्कर, अजय परदेशी, सतीश करनकाळे, शहर उपाध्यक्ष अलकेश माळी, विक्की मखिजा महेंद्र भामरे आदींचा समावेश होता.

No comments:
Post a Comment