सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव व जवाहर नवोदय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी व वनदिन साजरा !!
बोरघर, माणगाव, ( विश्वास गायकवाड ) : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगाव आणि जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला जागतिक चिमणी दिन आणि जागतिक वनदिन सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण माणगांव व प्रधानाचार्य जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर यांचे मार्गदर्शनाखली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण माणगांव कडील वनपाल श्री. पी. बी. बागल, श्री. राम सी. धायगुडे, श्री. वी. टी. पवार व वनरक्षक श्री. रा. रास सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्राधानाचार्य श्री. के. वाय. इंगळे उपस्थित होते. तसेच जेष्ठ शिक्षक श्री. संजय माने, श्री. केदार केंद्रेकर, श्री. रा. टी. माळी व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरूवात अतिथींचा सत्कार विद्यालयामार्फत करण्यात येवून वनांचे संरक्षण, संवर्धन व त्यांचे पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी असलेले महत्व याबाबतचे मार्गदर्शन श्री. पी. बी. बागल यांनी केले. श्री. के. वाय. इंगळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वृक्षंची लागवड व जोपासना करणेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कले. कार्यक्रमाचा शेवट श्री. संजय माने यांनी आभार व्यक्त करून केला व श्री. केदार केंद्रेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व कार्यक्रमाचा समारोप सत्यम प्रजापती या विद्यार्थ्यांने वृक्ष प्रतिज्ञा वाचून केला.

No comments:
Post a Comment