Tuesday, 22 March 2022

श्री गोपालकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने संपन्न झाला क्रिकेटचा महासंग्राम !!

श्री गोपालकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने संपन्न झाला क्रिकेटचा  महासंग्राम !!


कोकण, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :

        लांजा तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये गाजलेला क्रिकेट संघ म्हणजे श्री गोपाळकृष्ण क्रिकेट संघ करंबेळी वाडी खानवली ता. लांजा आणि याच संघाच्या वतीने( दि. १७ ते१९ मार्च २०२२) दरम्यान भव्य दिव्य क्रिकेट सामने भरवण्यात आले. 


यात तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदविला होता. सदर सामने खानवली चंपक मैदान येथे भरविण्यात आले होते. यात प्रथम विजेता म्हणून अद्विक स्पोर्ट लांजा तर उप विजेता म्हणून शिवप्रेमी कुवारवाडी (भडे) या संघाने पटकावला. सदर सामन्यात उत्कृष्ट फलंदाज सिद्धेश तर उत्कृष्ट फलंदाज तकवाण कुवरवाडी यांने आपली चोक कामगिरी केली. 


तर हे सामने उत्कृष्टपणे पारपाडण्यासाठी करंबेळी वाडी क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी खूप नेहनत घेतली. आणि हा संपुर्ण क्रिकेट संग्राम यशस्वी केला. तर सर्व देणगीदार मंडळीचे श्री. गोपालकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...