Tuesday, 22 March 2022

रत्नागिरी तालुक्यातील भोकेगावचा शिमगा ठरला तालुक्यातील आकर्षक शिमगा !!

रत्नागिरी तालुक्यातील भोकेगावचा शिमगा ठरला तालुक्यातील आकर्षक शिमगा !!


कोकण - (दिपक कारकर) :

कोव्हिड-१९ च्या परिस्थितीत कोकणाचे शिमगे गेल्या वर्षात थांबविण्यात आले होते.परंतु यां वर्षी मात्र कोव्हिडच्या नियमातून शासनाने दिलेल्या नियमानुसार कोकणातले शिमगं आनंदात साजरे होताना दिसत आहेत. 


कोव्हिडच्या परिस्थितीत चाकरमणी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये निर्माण झालेली फूट आणि विभागलेली नाती पुन्हा आनंदाने हसत खेळत ग्रामदेवातेच्या पालख्या नाचवत घरोघरी नांदली. ह्या वर्षी भोके गावचा शिमगा रत्नागिरी तालुक्यात आकर्षित झाला. शिमग्याच्या पहाटे मोरया क्रिएशन निर्मित "देव माझा भोके गावाचा" या सोहळा गाण्याच्या ड्रोन मास्टर अखिल माने यांनी चित्रीत केलेल्या नयनसुखी चित्रीकरणाचा आनंद घेता आला. गावातील विजय मायंगडे आणि प्रदीप रेवाळे यांनी संकल्पना आणि निर्मिती ह्या दोन्ही बाजू सांभाळून गाण्याचे एडिटिंग केले आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग/ मिक्सिंग/ मास्टरिंग/ संगीत/ गायक ही बाजू पंकज घाणेकर यांनी पाहिली आहे. व्हिडीओग्राफी ग्रामदेवातीची मंदार आंबेकर यांनी केली आहे. व्हिडीओ दृश्य सौजन्य प्रेम मायंगडे आणि शुभम मायंगडे यांनी सहकार्य केले आहे. देव माझा भोके गावाचा या गाण्याचा अनावरण सोहळा शिमग्याच्या दिवशी ग्रामस्थ मंडळाने मोठ्या उत्साहात पार पाडला. ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी रुपेश ल. रेवाळे, श्रीपत मायंगडे (सरपंच ), मंगेशजी जाधव, कारभारी रत्ना रेवाळे, अंनत मायंगडे गावकर आणि आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात अनावरण सोहळा पार पाडला. खास IBN लोकमत ने भोके गावाच्या शिमग्याचे काही क्षण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केले. भोके गावात दोन वर्षाने साजरा होत असलेल्या शिमगोत्सवामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...