Monday, 21 March 2022

विकास हवा की पर्यावरण; हवा शाश्वत विकास !! "कल्याण वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेचा पुढाकार"

विकास हवा की पर्यावरण; हवा शाश्वत विकास !! "कल्याण वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेचा पुढाकार"


कल्याण, ऋषिकेश चौधरी : विकास हवा की पर्यावरण हा वाद अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि तो पुढे चालत राहील. ह्या सर्वावर मुख्य उपाय म्हणजे शाश्वत विकास. 


म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील शाश्वत विकासाचा हट्ट धरला जात आहे. रस्ते विकास हे होणे देखील गरजेचे आहे; असाच विकास सध्या कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर होत आहे. २२२ नंबरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झालेले आहे त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली अनेक मोठी झाडे कापली जाणार आहेत किंबहुना कापायला सुरुवात देखील झालेली आहे. एका मोठ्या झाडाची किंमत काही लाखात असते त्याशिवाय त्याचे स्थानिक परिसंस्थेतील मूल्य तर मोजण्या पलीकडे असते. 


आपण यात काय करणार असा विचार करून सगळेच फक्त बघ्याची भूमिका घेतात पण यासगळ्याचे महत्त्व जाणून अशा झाडांमधली काही झाडे कल्याण वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेने शाळेचे मुख्य नियंत्रण अधिकारी श्री. अल्बीन सर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक घेतली आहेत आणि त्यांचे संपूर्णपणे  प्रत्यारोपण करण्याचे काम शाळेने हाती घेतले आहे. यात रायवळ आंबा, वड, करंज, देशी बदाम अश्या झाडांचा समावेश आहे. २१ मार्च जागतिक वन दिनाच्या दिवशी या कामाला सुरुवात झाली आहे. सेक्रेट हार्ट शाळेचे निसर्ग शिक्षण विभागाचे प्रमुख आणि या विषयाचे अभ्यासक श्री. भरत गोडांबे सर , रचना विभाग प्रमुख श्री. मोझेस सर तसेच इतर तज्ज्ञ  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने हा प्रकल्प हातात घेतला असून कल्याण वनविभाग यांची देखील या कामाला साथ लागलेली आहे. वरप येथील वनविभागाच्या जागेमध्ये या झाडांची पुनर्लागवड करण्यात येणार असून त्याची संपूर्ण देखभाल आणि काळजी चे काम सेक्रेड हार्ट स्कूल करणार आहे अशी माहिती शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भूषण जाधव यांनी दिली तसेच हा प्रकल्प विद्यार्थी तसेच येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरेल असे शाळेच्या अध्यापनशास्त्र विभागाच्या प्रमुख  सौ. सजिता नायर म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...