Wednesday, 16 March 2022

"कोळसेवाडी पोलीस स्टेशन" हदद्दीत दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई !!

"कोळसेवाडी पोलीस स्टेशन" हदद्दीत दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई !!


कल्याण, हेमंत रोकडे : कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुप्रसिध्द गुंड आशिष प्रेमचंद पांडे वय २३ वर्षे रा. गायकवाड नगर चाळ नं. ०१ रुम नं. ३ कैलासनगर कल्याण पुर्व जिल्हा ठाणे याचेवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न गैरकायदयाची मंडळी जमवून दंगा करणे, दमदाटी करणे, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, ई. शरीरा विरूध्द व मालमत्ते विरूध्द गंभीर स्वरूपाचे एकुण ७ गुन्हे विठ्ठलवाडी, कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल असल्याने त्याचेविरूध्द एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई करून त्यास दि. १०/०३/२०२२ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे १ वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले आहे.

प्राप्त प्रस्ताव व सहकागदपत्रांची पडताळणी करून जय जीत सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ - ३ यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी पोलीस स्टेशन, कल्याण यांनी प्रस्ताव सादर करून व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमपीडीए कक्ष, ठाणे शहर यांनी स्थानबध्दतेची कारवाई केलेली आहे. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांचेवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्याची कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...