रिअल स्पोर्टस फाउंडेशनचे उद्घाटन !! "मान्यवरांची उपस्थिती"
ठाणे, बातमीदार : समाजातील गरजू खेळाडूंना मदतीचा हात देणाऱ्या राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून रिअल स्पोर्टस फाऊंडेशन ची नुकतीच स्थापना करण्यात आली या संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन माजी रणजी क्रिकेटर गोपाळ कोळी व रबी घडीयार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अभिजीत राणे, विख्यात कामगार नेते आणि पत्रकार प्रशांत शेट्टी - एम आय जी क्रिकेट क्लब, उदयसिंह भोसले - नॅशनल क्रिकेट अकादमी प्रशिक्षक, जयश्री दिदी - ब्रम्हाकुमारीत्र क्रिडा समुपदेशक, बनी सलील, बाबर देसाई - मुंबई महीला प्रशिक्षक, तसेच विशेष उपस्थिती म्हणून चंद्रकांत शेटे छत्रपत्ती क्रीडा पुरस्कार-कबड्डी हे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे रिअल स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने आयुष म्हात्रे या स्टेट खेळाडू चा देखील सम्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांनी सांगितले की गुणवत्तेच्या जोरावर खेळाडूनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कला गुणांची चमक दाखवावी प्रसिद्धी माध्यम आणि वैयक्तीक ही आपल्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल असे प्रतिपादन केले.
तर प्रशांत शेट्टी यांनी आपल्या भाषणात खेळाडू कसा घडतो या बद्दल उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले तर भोसले सरांनी पालकांसाठी मुलांना घडवतांना कशी काळजी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले, बम्हाकुमारी दीदी यांनी खेळाच्या मानसिक आरोग्याचे विश्लेषण केले व मेडीटेशन केल्याने खेळाडूला काय फायदा होतो याचे विश्लेषण केले.
या कार्यक्रमात गोपाळ कोळी यांनी मुलांना यशाचा कानमंत्र दिला तर रवी घडीवार सरांनी या उपक्रमाचे खुप कैतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल कुलकर्णी व आभार प्रदर्शन राकेश कोहली यांनी केले. या रीअल स्पोर्टस फाउंडेशनचे कार्यालय पाटील अपार्टमेंट चे कार्यालय, खोज गल्ली, माहीम, मुंबई, येथे असणार आहे




No comments:
Post a Comment