पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा दणका'शेरे गावात टँकरने पाणी पुरवठा, प्रशासनाचे आभार !
कल्याण, (प्रतिनिधी) : नेहमीच समाजाभिमुख पत्रकारिता करणारे कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांनी शहापूर तालुक्यातील शेरे गावातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीरतेने मांडला, याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहापूर तालुक्यातील शेरे गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो या महामार्गात केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंग मुळे बौद्ध वाडी व आदिवासी वाडीतील अनेकांच्या घरांना तडे गेले होते. यावेळी पत्रकार संजय कांबळे यांनी या विरोधात विविध दैनिकामधून बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, याठिकाणी अंदोलन देखील झाले होते.
आता येथील वाडी पाड्यात गेल्या एक ते दिड महिन्यापासून अनियमित पाणी पुरवठा होत होता. अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. येथील ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा शेरे ग्रामपंचायतीला दिला होता, तसे पत्र दिले होते. यावर रेणुका धनगर, सविता भालेराव, वंदना पंडित, अविनाश धनगर, मनोहर धनगर, हरिभाऊ धनगर, अनंता पंडित, भास्कर पंडित, किशोर पंडित, रामचंद्र पंडित, जयश्री धनगर,संतोष धनगर, संदेश धनगर, भगवान उबाळे, आणि गौतम उबाळे आदी ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. परंतु एक आठवड्यानंतरही याची कोणत्याही प्रकारची दखल ग्रामपंचायतीने घेतली नव्हती,
अखेरीस विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पत्रकार संजय कांबळे यांनी आपल्या विविध दैनिकामधून 'शहापूर तालुक्यातील शेरे गावात भीषण पाणी टंचाई, ग्रामस्थांचा अंदोलनाचा इशारा, पाणी योजना खड्यात? अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच शेरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांपासून ते वरीष्ठ अधिका-यापर्यत सर्व यंत्रणा कामाला लागल्या, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. पुष्पा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून अधिका-याना ही पाणी टंचाई दूर करण्याच्या सूचना दिल्या गटविकास अधिकारी. तसेच पाणी पुरवठा अधिकारी पांढरे मँडम, ग्रामसेवक राहुल मोरे यांनी तातडीने आदिवासी वाडी येथे टँकर पाठवला, पण गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने टँकरवर झुंबड पडली, यामध्ये अनेकांना पाणी मिळाले नाही, त्यामुळे अजून काही टँकर मागविण्यात आले आहेत असे ग्रामसेवक मोरे यांनी सांगितले. तर ही तात्पुरती सोय केली आहे, पाणी प्रश्न कायमचा सोडवावा असे सामाजिक कार्यकर्ते किशोर पंडित यांनी सांगितले. तसेच ही समस्या तातडीने मांडल्या बद्दल व ती सोडविल्याबद्ल त्यांनी पत्रकार संजय कांबळे व प्रशासनाचे आभार मानले.


No comments:
Post a Comment