Wednesday, 9 March 2022

ठाणे भारत स्काऊट गाईड कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न !! *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून महिलांनी समाजाच्या विकासासाठी आत्मनिर्भर व्हावे संगीता शिंपी यांचे प्रतिपादन.*

ठाणे भारत स्काऊट गाईड कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न !!

   *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून महिलांनी समाजाच्या विकासासाठी आत्मनिर्भर व्हावे संगीता शिंपी यांचे प्रतिपादन.*                           
       
ठाणे, संदीप शेंडगे : जिल्हा स्काउट्स अँड गाईड्स कार्यालय ठाणे येथे ठाणे जिल्हा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ललिता दहिदुले यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सुपरवायझर  संगीता शिंपी शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा सोनटक्के, महिला आर एस पी अधिकारी रेखा प्रभू, गायत्री सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन  स्काऊट गाईड आयुक्त संगीता रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रम करिता  ललिता दहितुले, उपशिक्षणाधिकारी जि प ठाणे, वर्षा सोनटक्के, विस्तार अधिकारी जि प ठाणे, डॉ. तृप्ती सोनवणे प्राध्यापिका ठाणं कॉलेज, गायत्री सपकाळे, रेखा प्रभू आर एस पी महिला अधिकारी, संगिता शिंपी महिला बालविकास अधिकारी घाटकोपर, प्राची जगताप फिजियोथेरपिस्ट साधना जोशी लेखिका, पुष्पलता पाटील मुखध्यपिका नवी मुंबई मनपा शाळा क्रं ३५ कोपरखैरणे, इत्यादी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्तिथीती होत्या. 


कार्यक्रमाच्या प्रमूख अध्यक्ष दहितुले यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला लॉर्ड आणि लेडी बेडन पावेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तसेच इतर पाहुण्याच्या उपस्तिथीत दीप प्रज्वलन करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत  "या कुंदे " या स्वागत गीताने  गीताचे गायन शैलजा औटी (एल टी गाईड)  संध्या निकम  पाहुण्या आणि महिलाचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता रामटेके जिल्हा संघटक ठाणे यांनी केले. 


उपशिक्षणाधिकारी दहितुले  यांनी  स्काऊट गाईड शिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले तसेच मुलींमध्ये आरोग्य शिक्षण व नागरी संरक्षण याविषयी माहिती होणे गरजेचे आहे. महिलांनी स्वकर्तुत्वाने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी जिद्दीने पुढे यावे असे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमाचा प्रमुख मार्गदर्शक साधना जोशी यांनी महिलांच्या अस्तिव, जाणीव अधिकार, समाजातील महिला बाबत दृष्टिकोन ज्ञान बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच विविध क्षेत्रातील महिला अधिकारी आणि माझे समाज कुटूंब माझी जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. महिला बाल विकास विभागातील सुपरवायझर संगीता शिंपी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन  बालविकास क्षेत्रातील महिलांचा विविध योजनांच्या उपक्रमांची माहिती व अंगणवाडी  केंद्रामार्फत किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शनपर विविध योजनांबद्दल माहिती दिली. लहान वयातील मुलींमधील कुपोषित पणा कमी करण्यासाठी योग्य पोषण आहाराविषयी माहिती दिली. डॉ.प्राची यांनी महिलांचे आरोग्य, कोव्हींड १९ या आजार पासून स्वसंरक्षण, स्वच्छते बाबत माहिती श्वसनक्रिया बाबत  प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन केले, तसेच पुष्पलता पाटील यांचा ठाणे भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय वतीने सेवा निवृत्ती बाबत सत्कार करण्यात आला. महिला आर एस पी अधिकारी रेखा प्रभू व गायत्री सपकाळे यांनी प्रत्येक महिला भगिनीने आपल्या घरातून वाहतुकीचे नियम अमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती. जागतिक महिला दिन निमित्त आलेल्या सर्व उपस्थित महिलांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अलमेडा, मुख्याध्यापिका  माधुरी प्रधान ग्रीन इंग्लिश स्कूल डोंबिवली, दीपाली पाटील आदिवासी आश्रम शाळा भिनार, श्रध्दा सांगळे, विशेष उपस्तिथीती होती तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवीमुंबई मनपा शाळेतील शिक्षिका या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संध्या निकम यांनी केले ठाणे भारत स्काऊट गाईड कार्यलय वतीने उपस्थित महिलांना भेट वस्तू, दुपारचे भोजन अशी व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या स्वागताकरिता श्रीमती कोडपे, आर के अभंग विद्यालय उल्हासनगर गाईड कॅप्टन यांनी रांगोळी  काढली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगिता रामटेके जिल्हा संघटक, सोनाली राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांचे ठाणे जिल्हा स्काऊट गाईड आयुक्त संगिता रामटेके यांनी विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...