भिवंडीत आगीचे सत्र सुरूच, पुन्हा आग, कागदी रोलचे गोदाम जळून खाक !!
भिवंडी, दिं,६, अरुण पाटील (कोपर) :
ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त आगी लागण्याच्या घटना या भिवंडी तालूक्यात घडत असून त्यातल्या त्यात या आगी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त प्रमाणात लागत असून या आगी जानेवारी ते मार्च महिन्यात जास्त प्रमाणावर लागत आहेत.अशीच एक आगची घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली आहे.
ही आग अंजूर फाटा --मानकोली रोडवरील वळपाडा हद्दीत असलेल्या दादोबा कंपाउंड मधील पुठ्ठयाचे बॉक्स बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदी रोलच्या गोदामाला शनिवारी लागून या आगीत गोदाम जळून खाक झाले आहे .
या गोदामाला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. या कागदी रोलवर पाण्याचा फवारा मारल्या नंतरही केमिकलमुळे रोल पुन्हा पेट घेत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलास मोठे प्रयत्न करावे लागले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसून या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर दोन ते तीन तासात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

No comments:
Post a Comment