Saturday, 5 March 2022

दिशा सलियन चौकशी प्रकरणी पोलिसांवर मोठा दबाव. योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन -- नारायण राणे.

दिशा सलियन चौकशी प्रकरणी पोलिसांवर मोठा दबाव. योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन -- नारायण राणे.


भिवंडी, दिं,५, अरुण पाटील (कोपर) :
           दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याच्या गुन्ह्याखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, ज्यानंतर आता मालवणी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंं. जवळपास 8 तास नारायण राणे यांची चौकशी चालली. ज्यानंतर राणेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर मोठा दबाव असून योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन अशी माहिती चौकशीदरम्यान नारायण राणे यांनी दिली आहे.
            दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणें विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणें.विरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
       त्यानंतर त्यांची या वक्तव्याप्रकरणी आज चौकशी करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांच्या मते, पोलिसांना दर 10 मिनिटांना फोन येत होते. ज्यातून त्यांच्यावर वरच्या स्तरातून दबाव असल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळे माझ्याकडील पुरावे योग्यवेळी सीबीआयकडे देईन असं यावेळी राणे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !! मुंबई, प्रतिनिधी : द...