संध्याकाळी मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने वाहतूक विस्कळीत !!
भिवंडी, दिं,५, अरुण पाटील (कोपर) :
आज संध्याकाळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.
मेल एक्सप्रेस मधून एक ताडपत्री उडून ती ओव्हरहेड वायरला चिकटली असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या (रविवारी) याच मार्गावर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक पाहणी करण्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडली आहे. नक्की या मार्गावर काय अडचणी आहेत याचं हे उदाहरण असल्याचं मत कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केलं आहे."

No comments:
Post a Comment