राष्ट्रवादीचा पलटवार, देवेंद्र फडनवीसांनी घेतले मुंबई बॉम्ब स्फ़ोटातील आरोपी इक्बाल मेमन कडून वीस कोटी रुपये, 'ईडी'कडे तक्रार !!
भिवंडी, दिं,५, अरुण पाटील (कोपर) :
मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपावरून ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यांना सात मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत राज्यातील भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यात सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने गुंड इक्बाल मेमनशी संबंधित असलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 20 कोटी रूपये घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
इक्बाल मेमन हा 1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असून अनेक ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणातही त्याचे नाव समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर, नवाब मलिक यांना ज्या पद्धतीने अटक केली, तशीच कारवाई देवेंद्र फडणवीस यांच्यावर करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र लिहिले असून आरोपांशी संबंधित कागदपत्रेही ईडीकडे सुपूर्द केली आहेत. त्यामुळे ईडी या संदर्भात काय प्रतिक्रिया देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्तेत आल्यावर २०१४ नंतर भाजपला 'आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स' या कंपनीने डोनेशन म्हणून २० कोटी रुपये दिले. पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राजेश वाधवान याची ही कंपनी आहे. तसेच, या कंपनीचे इक्बाल मेमन सोबतही संबंध आहेत, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच, या कंपनीच्या माध्यमातून मेमन मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो, असेही गोटे म्हणाले. भाजपने हे डोनेशन स्वीकारले तेव्हा राज्यात भाजपचे प्रमुख देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी गोटे यांनी केली आहे.
अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले आहेत. आरोपांबाबत फडणवीस म्हणाले, 'भाजपने कपिल आणि धीरज वाधवान यांच्या कंपनीकडून आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे स्वीकारले होते. या पैशांचा इक्बाल मेमनशी कोणत्याही मालमत्तांशी काहीही संबंध नाही. खोटे आरोप केल्यामुळे आता आम्ही मानहानीचा दावा करणार आहोत.

No comments:
Post a Comment