ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 9 मार्च रोजी जळगाव जिल्हा परिषदेसमोर निदर्शने !!
चोपडा (जळगाव), बातमीदार : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवीन किमान वेतन प्रमाणे पगार व फरक ध्या. पगारासाठी वसुलीची अट रद्द करा, आकृतिबंधात सुधारणा करा १० टक्के आरक्षणाच्या जागा भराव्यात म्हणून तसेच यावलकर समिती या शिफारशी मान्य कराव्यात, दीपक भैसेकर समितीच्या शिफारशींच्या अहवालाप्रमाणे निवृत्ती वेतन लागू करावे, म्हणून आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूरला जानेवारीत आठ दिवस आंदोलन केले, त्यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा पूर्ततेची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
परंतु अद्यापही कर्मचाऱ्यांच्या मागण्याचे पूर्तता बाबत दिरंगाई केल्याने कर्मचारी मध्ये असंतोष पसरला आहे म्हणून येत्या 9 मार्च रोजी महाराष्ट्र भर जिल्हा परिषदांवर आंदोलन निदर्शने धरणे करण्याचा इशारा दिला आहे. अतःपर सरकारने मान्यता न घेतल्यास नऊ एप्रिल रोजी परत कोल्हापूरला ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे वतीने एल्गार पुकारला जाणार आहे. असा निर्णयानुसार त जळगाव जिल्हा परिषदेवरही 9 मार्च 2022 बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची निदर्शने केले जाणार आहेत तरी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आंदोलनास वेळेवर हजर राहावे असे आव्हान...
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे आयटकचे राज्य सचिव अमृत महाजन, जिल्हाध्यक्ष संतोष खरे, राज्य समिती सदस्य महेंद्र धनगर, रवींद्र पाटील, अशोक जाधव, तसेच रतिलाल पाटील, किशोर कनडारे, शेख मुख्यत्यार शेख रशीद, विश्वास पाटील, अशोक गायकवाड, रमेश पाटील, शंकर दरी, मुरलीधर जाधव, प्रदीप तानगड, राजेंद्र खरे, निलेश पाटील, मुश्ताक शेख, संदीप देवरे, मलखान, राठोड, प्रदीप जोशी, विठ्ठल कोळी, अमोल, महाजन, प्रकाश रल, गोटू पाटील, शिवशंकर महाजन, बापू पाटील, योगेश माळी, संतोष धीवर, मधुकर जंगले आदींनी केले आहे.



No comments:
Post a Comment