राज्य शासनाची शालेय पोषण आहाराच्या तांदळावर डल्ला, चिमुकल्याच्या तोंडाचा घास चोरणाऱ्या ठेकेदारा वर कार्यवाही करा !!
"नाहीतर भारतीय राष्ट्रवादी पार्टी तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा" *अजित प्रकाश संचेती ; संपर्कप्रमुख*
पुणे, बातमीदार, दि ०५ : ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने, त्या कुटुंबातील मुले शालेय पोषण आहाराच्या निमित्ताने शाळेत शिक्षण घेतात.त्यातून चिमुकल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारकडुन शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली. यामध्ये मुलांना शाळेतच तांदुळाची खिचडी तयार करुन दिली जात होती त्यामुळे तांदळाच्या साठ्याची नोंद होत नव्हती आणि याचाच फायदा घेऊन ठेकेदार आणि पुरवठादार तांदळाची चोरी करु लागले.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ४६८ शाळांमध्ये अंदाजे १४ टन तांदळाचा पुरवठा सुरु आहे. काही भागात तांदुळ पुरवठा झालाय त्याही ठिकाणी प्रत्येक पोत्याच्या वजनात घट आहे मागच्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद होत्या या काळातही तांदुळ पुरवठादाराकडुन तांदळाचा पुरवठा कमी करण्यात आल्याचे शिक्षक आणि शाळा समितींच्या निदर्शनास आले कालच कळले यावेळी सात महिन्याचा एकत्र तांदुळ शाळांमध्ये पुरवठा होत असताना शिक्षकांनी सतर्क होऊन तांदळाच्या पोत्यांचे वजन करण्याची मागणी केली आणि ५० किलो तांदळाच्या प्रत्येक पोत्यात ७ किलोची घट असल्याचे निर्देशास आले आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची शालेय पोषण आहार योजना नेहमीच चर्चेचा विषय झालीय या योजनेत घरी तांदूळ देण्यापासून ते शाळेत भोजन देण्यापर्यंत अनेक वेळा बदल होत गेले मात्र यामध्ये कंत्राटदार आणि शिक्षण यंत्रणांचे पोषण झाले या योजनेचे काम पाहण्यासाठी मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत वेगवेगळे अधिकारी नेमले आहेत.परंतु त्यांना योजनेच्या अडीअडचणी कधी दिसतच नाहीत का? म्हणून या मध्ये आपण लक्ष घालून आशा भ्रष्टाचारी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अथवा भारतीय राष्ट्रवादी पार्टी रस्त्यावर उतरून या बाबत आंदोलन करेल असे निवेदन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व पुणे जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख साहेब यांना पत्रव्यवहार द्वारे मागणी केली आहे.
अजित प्रकाश संचेती ; संपर्कप्रमुख 📞 +91 91722 07776


No comments:
Post a Comment