Tuesday, 8 March 2022

ग्रामसेविकेच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यास विलंब लावणा-या चौकशी आधिका-यावर कारवाई?

ग्रामसेविकेच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यास विलंब लावणा-या चौकशी आधिका-यावर कारवाई?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील मौजे उशीद गावातील मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब महिलेने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविके विरोधात कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे दिड ते दोन महिण्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने याची चौकशी विस्तार अधिकारी कृषी यांच्या कडे देण्यात आली होती. परंतु आज इतका कालावधी होऊन देखील अद्यापही या तक्रारीची चौकशी न करणाऱ्या आधिका-यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे विस्वसनीय वृत्त आहे.


मौजे उशीद गावात राहणाऱ्या श्रीमती सुरेखा सागर उघडे या मोलमजुरी करणाऱ्या महिलेला ५ जानेवारी २०२२ रोजी उशीद ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करून सरपंच, उपसंरपच सदस्य यांच्या एकमताने घरपट्टी दिली. यांनतर ग्रामपंचायतीवर प्रशासक बसले. २०/२५ दिवसानंतर या ग्रामपंचायतीच्या "कर्तव्यदक्ष" ग्रामसेविका श्रीमती माधुरी राठोड यांना 'साक्षात्कार' झाला व त्यांनी श्रीमती सुरेखा उघडे या मोलमजुरी साठी बाहेर गेल्या असताना, घरी कोणीही नसताना स्वतः ग्रामसेविका माधुरी राठोड, शिपाई दिलीप शिंगे आणि डाटा आँपरेटर यांना घेऊन माझ्या लहान मुलाला काही तरी भूलथापा देऊन, फसवणूक करून दिलेली घरपट्टी बेकायदेशीर पणे परत आणली, या कृत्यामुळे उघडे कुंटूबाची गावात मोठ्या प्रमाणात बदनामी, मानहानी, मानसिक, शारीरिक त्रास झाला होता, त्यामुळे अशा मनमानी व बेकायदेशीर कामे करणाऱ्या ग्रामसेविकेच्या विरोधात सुरेखा उघडे यांनी कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली होती. 


यानंतर गटविकास अधिका-यानी सदरच्या ग्रामसेविकेला रितसर नोटीस बजावली होती व याची चौकशी कृषी विस्तार अधिकारी दिनेश घोलप यांच्या कडे सोपवून याचा अहवाल निपक्ष, स्वयंमस्पष्ट देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आज एक ते दिड महिना उलटून ही अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्याने श्रीमती सुरेखा उघडे व त्यांचे कुंटूबिय कल्याण पंचायत समितीला चकरा मारीत होते. विशेष म्हणजे प्रांरभी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देणारे, त्यांचेवर कडक कारवाई करणारे गटविकास अधिकारी अशोक भवारी यावेळी मात्र हातावर हात धरून कसे काय गप्प? हे न उलगडणारे कोडं आहे.


तर अनेक ग्रामसेवकांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करण्यास सांगून देखील कित्येक महिने, वर्षे जाणीवपुर्वक विलंब लावणारे विस्तार अधिकारी ग्रामसेवकाना का पाठीशी घालतात? हे संशय निर्माण करणारे वाटते, तर यामागे विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे 'आर्थिक साटेलोटे' असल्याचा आरोप तक्रारदार महिला सुरेखा उघडे यांनी केला आहे. उशीद, रायते, म्हारळ, कांबा आदी बहुतांश ग्रामपंचायतीचे चौकशी अहवाल पेंडिग आहेत. त्यामुळे उशीद ग्रामपंचायतीचे चौकशी अधिकारी दिनेश घोलप यांना याबाबत नोटीस बजावण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

प्रतिक्रिया :-

विस्तार अधिका-याकडून चौकशी ना विलंब होत आहे, हे खरे आहे, त्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात.--अशोक भवारी, (गटविकास अधिकारी, उच्च श्रेणी, कल्याण पंचायत समिती)

*विस्तार अधिका-यांकडे अनेक तक्रारीची चौकशी देण्यात आलेली असते, त्यामध्ये तक्रारी चे स्वरूप, गांभीर्य, वेळ काळ, घटना याचा विचार करून तक्रारी ना प्राधान्य देण्यात येते- (चंद्रकांत पवार, डेप्युटी सीईओ, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, ठाणे) 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...