मास्टर जयेश वेल्हाळ यांची वर्ल्ड पोलिस तायक्वांदो फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तांत्रिक समितीमध्ये निवड !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मास्टर जयेश वेल्हाळ हे 6 डॅन ब्लॅक बेल्ट असून आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक आहेत. नुकतीच वर्ल्ड पोलिस तायक्वांदो फेडरेशनची जनरल असेम्ब्ली दिनांक 22 ते 23 एप्रिल 2022, साऊथ कोरिया, रिवेरा हाॅटेल, गामनाम- गू, सिओल येथे पार पडली. ह्या जनरल असेम्ब्ली मध्ये संपूर्ण जगभरातून 19 सदस्यांची निवड करण्यात आली असून भारताच प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे अध्यक्ष मास्टर जयेश वेल्हाळ यांची निवड करण्यात आली आहे. भारतातील ही पहिली निवड मानली जाते ज्यांची वर्ल्ड पोलिस तायक्वांदो फेडरेशन वर आंतरराष्ट्रीय पातळीवर तांत्रिक समिती मध्ये निवड झाली आहे.
या तांत्रिक समिती मध्ये संपूर्ण जगभरातून भारत, तुनिशिया, सुदान, स्पेन, सिंगापूर, कतार, नेपाल, केनिया, कोरिया, कझाकस्तान, इराक, हाॅंगकाॅंग, वोट द इंदोरी, कोलंबिया, यु.एस.ए. फक्त या 19 देशांचे सदस्य प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच कुक्किवाॅन चेअरमन जियन कबकील यांनी मास्टर जयेश वेल्हाळ यांचा कुक्किवाॅन मध्ये बोलावून त्यांचा सत्कार केला. मास्टर जयेश वेल्हाळ यांची निवड झाल्याबद्दल वर्ल्ड पोलिस तायक्वांदो फेडरेशनचे अध्यक्ष सेऊंग हो बंग यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
भविष्य काळात भारताला ही वर्ल्ड पोलिस तायक्वांदो गेम्स मध्ये लाभ करून देण्यासाठी कार्यरत राहतील. या जनरल असेम्ब्ली मध्ये येणाऱ्या भविष्य काळात वर्ल्ड पोलिस तायक्वांदो फेडरेशन मार्फत बरेच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मास्टर जयेश वेल्हाळ यांचे कोरियातील ग्रॅन्ड मास्टर किम आणि वर्ल्ड पोलिस तायक्वांदो फेडरेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व चेअरमन यांनी भारतातच पहिले व्यक्तिमत्व जे आंतरराष्ट्रीय तांत्रिक समिती मध्ये काम करणार असुन आणि मास्टर जयेश वेल्हाळ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर आत्ता पर्यंत जी कामगिरी केली आहे व करत आहेत त्यामुळे ते या पदासाठी मानकरी ठरले आहेत.

No comments:
Post a Comment