कल्याण डोंबिवली नगरीत सायकल संस्कृती राबविण्यासाठी महापालिका आयुक्तांचा पुढाकार !
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात घट व्हावी तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या "माय सिटी फिट सिटी" या संकल्पनेनुसार कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांनी सायकलचा वापर करून फिजिकली फिट राहावे यासाठी सायकल संस्कृती कल्याण-डोंबिवली नगरीत राबवण्यासाठी /वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आता पुढाकार घेतला असून सदर संकल्पना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी कल्याण सायकल क्लबचे कार्यकारिणी सभासद व डोंबिवली सायकल क्लबचे कार्यकारिणी सभासद यांच्यासमवेत सोमवार *दिनांक 25/04/2022 रोजी दुपारी 04.00 वाजता* महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर संकल्पनेचे कल्याण सायकल क्लबचे अद्वैत जाधव, किरण गोरे, डोंबिवली सायकलिंग क्लबचे डॉ. पुणतांबेकर, सारंगधर त्याचप्रमाणे हिरकणी सायकलिंग ग्रुपच्या सुरेखा गटकल यांनी स्वागत केले असून सदर बैठकीस या सर्व क्लबचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरात प्रामुख्याने नवीन पिढीमध्ये सायकल संस्कृती वाढवावी, तिचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या या संकल्पनेस नागरिकांनी तसेच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील कल्याण-डोंबिवली शहरात अंतर्गत वाहतुकीसाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन कल्याण सायकल क्लब चे सदस्य - महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले आहे.
सौजन्य :- फेसबुक पेज :- KDMC

No comments:
Post a Comment