Sunday, 24 April 2022

भिवंडीतील नारपोली पोलीसानी मोठ्या शिताफीने केले ४ आरोपींकडून १७ लाखांचा मुद्दे माल जप्त !!

भिवंडीतील नारपोली पोलीसानी मोठ्या शिताफीने केले ४ आरोपींकडून १७ लाखांचा मुद्दे माल जप्त !!


भिवंडी, दिं,२४, अरुण पाटील (कोपर) :

             भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळ गाव येथील एका बंद गोदामाचे डुप्लिकेट चावीने उघडून आतील १७ लाख रू. किंमतीचा मुद्दे माल चोरून नेणाऱ्या ४ अज्ञात आरोपीना नारपोली पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.


           सौरभ कमलकुमार त्रिपाठी, (वय -१९ वर्ष,रा. काल्हेर गाव- भिवंडी,पांचगगा सोसायटी ),केशव नवसू पवार, (वय -३३, रा. हलवापाडा -अंजूरफाटा, भिवंडी मेहबूब आलम कलीम मुल्ला खान (वय -४३, रा.रोशन) बाग, भिवंडी ), अमरीश सुदाम जैस्वाल, (वय -३६,रा. रामदेव पार्क, मीरा रोड, भायंदर) असे अटक आरोपींची नावे आहेत.
         ७/४/२०२२ रोजी १०.५० वा.सदर आरोपीनी संगतमत करून नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळ  गाव येथील प्रितेश कॉम्प्लेक्स येथील "युनिव्हर्सल कॉर्पोरेशन" लि. कंपनीचे गोडाऊनच्या शटरचे कुलूप ड्युप्लिकेट चावीने उघडून गोडाऊन मध्ये ठेवलेले ६०७०.५ लिटरचे ऑलिव्ह ऑईल, ड्राइफ्रूट, मध (हनी) ओट्स, चोकोस्प्रिट, पिंट्स बटर, पास्ता, पिझ्झा, पिझा सॉस, असा २० लाख ९० हजार ९६ रू.किंमतीचा माल घरफोडी करून  चोरून नेला होता.
            या  प्रकरणी कंपनी व्यवस्थापक देवशंकर जितेंद्रलाल दास (वय -४३, रा. नयनसागर कॉम्प्लेक्स -काल्हेर) याने नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या अनुशंगाने हि कारवाई भिवंडीचे पोलीस उपायुक्त, परि मंडळ  -२ चे श्री. योगेश चव्हाण,
सहाय्यक पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. प्रशांत ढोले, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री. केतन पाटील, सहाय्यक उप निरीक्षक श्री. धिवार, पोलीस हवालदार श्री. सातपुते, पोलीस नाईक श्री. पाटील, पोलीस नाईक श्री. सोनगिरे, पो /ना जाधव, पोलीस शिपाई श्री. बंडगर,पो /शि,श्री.ताठे यांनी अथक प्रयत्न करून वरील आरोपींना  १८/४/२०२२ रोजी ००.४५ वा अटक करून या आरोपीन कडून २० लाख ९० हजार ९६ रू, किंमती चोरलेल्या मला पैकी १७ लाखांचा माल जप्त केला आहे.
        या आधीही नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ यांनी बरेच गुन्हे उघडकीस आणून आरोपीनवर कठोर कारवाई केल्याने गुन्हेगारांवर व गुन्ह्यांवर मोठा आळा बसल्याने या परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे परिसरातील नागरिकांन कडून बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...