रोटरी क्लब ऑफ बाँबे सेंट्रल कडून माणगाव उप जिल्हा रुग्णालयास नेत्र शल्यचिकित्सा व शस्त्रक्रयेसाठी प्राप्त झालेल्या साधन समुग्रीसह सुसज्ज शस्त्रक्रिया दालनाचे लोकार्पण !!
बोरघर / माणगाव, ( विश्वास गायकवाड ) : माणगाव उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या अथक प्रयत्नाने व रोटरीअन तसेच माणगाव शिरवलीचे सुपुत्र दत्ताराम शिंदे यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेन्ट्रल च्या माध्यमातून तंदुरुस्त भारत अर्थसह्यातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित नेत्रचिकित्सा आणि नेत्र शस्त्रक्रियेसाठी अत्यंत उपुक्त अश्या वैद्यकीय साधन समुग्रीचे माणगाव च्या विद्यमान उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर आणि माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते उदघाटन तथा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल च्या रोटरीअन निरुपमा कम्युनिटी सर्विसेस हेड, निलिमा विद्यमान अध्यक्षा, काजल तांडी पुढील अध्यक्ष, दत्ताराम शिंदे प्रोजेक्ट हेड, आरती शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदीप इंगोले, डॉ कामेरकर, नेत्र विकार तज्ञ डॉ. शंतनू डोईफोडे, डॉ. सिद्धी कामेरकर, डॉ इंगोले, इन्चार्ज सिस्टर अर्चना बाणे, प्रदीप देवरे, बांगर, सुरज महाडिक, विवेक गायकवाड, विवेक नितनवरे, हेमंत जाधव, अनिल तेटगुरे, तारतंत्री गांधी, रुग्णालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सामुहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. या नंतर उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत व तदनंतर उपस्थितीत सर्व मान्यवरांचे मनोगत,वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदीप इंगोले यांचे लक्षवेधी सूचक मनोगत व आभार प्रदर्शन झाले.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेन्ट्रल चे अध्यक्ष शेखर मेहता, राजेन्द्र अग्रवाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर,डॉक्टर सुनील वासानी प्रेसिडेंट, रुपाल मनिकलाल सेक्रेटरी,रोटरी यन निरुपमा क्युमुनिटी सर्व्हिसेस हेड, निलिमा विद्यमान अध्यक्ष, काजल तांडी पुढील अध्यक्ष,दत्ताराम शिंदे प्रोजेक्ट हेड,आरती शिंदे यांच्या माध्यमातून तंदुरुस्त भारत अर्थसह्यातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयास सुमारे सतरा ते साडेसतरा लाखाची Phaco machine, atorefatometer, chair unit, slit lamp medical equipment इत्यादी वैद्यकीय साधन सामुग्री देण्यात आली. या अत्याधुनिक ऑपथाल्मिक मशनरी मुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात या पुढे जुन्या पद्धतीने डोळ्यांची तपासणी चिकित्सा आणि शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन कंप्युटराईज पद्धतीने चष्म्याचा नंबर काढणे, लेझर पद्धतीने मोतीबिंदू ऑपरेशन इत्यादी सुविधा रुग्णांना अत्यल्प शुल्कात प्राप्त होणार आहेत. सदर अत्याधुनिक मशनरी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांची नेत्र चिकित्सा, निदान आणि उपचार केले जाणार आहेत.

No comments:
Post a Comment