मुंबई उपनगर खो खो संघटनेची राज्य पंच परीक्षा संपन्न !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्र खो खो असोसिएशन आयोजित मुंबई उपनगर खो खो संघटनेची आज अंतर्गत पंच परीक्षा साकीनाका येथील समता विद्या मंदिरात घेण्यात आली. या परीक्षेत 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचे निरीक्षण माधुरी कोळी यांनी काम पाहिले तर उपनगर तर्फे डॉ. नरेंद्र कुंदर यांनी सह परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी मुंबई उपनगर खो खो संघटनेचे अध्यक्ष राजेश सुभेदार हे उपस्थित होते. या प्रसंगी साधुराम भर , नेहा घाडी, नम्रता सकपाळ, बाबू सर यांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment