Thursday, 12 May 2022

*मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपची "अन्नपूर्णा योजना" एक नावीन्यपूर्ण संकल्पना !! 👉 दरमहा 150 गरजू विधवा महिलांना रेशन वाटप .

*मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपची "अन्नपूर्णा योजना" एक नावीन्यपूर्ण संकल्पना !! 

👉 दरमहा 150 गरजू विधवा महिलांना रेशन वाटप  .   

कल्याण ( मनिलाल शिंपी ) : मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख कमांडर मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दिनेश भाई ठक्कर, स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील माध्यमातून,विविध दात्यांचा सहकार्याने  दरमहा 150 विधवा गरजू महिलांना अन्नपूर्णा योजने अंतर्गत 15 किलोचे रेशन किट दिले जाते, आज बापगाव येथील भामरे कुटुंबावर अचानक दुःखाची सावली आली आणि घरातील कर्ता माणूस काळाने हिरावून नेला. 


म्हातारे आई वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आणि अत्यंत हालाखीची परिस्थिती पाहून, मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपने या कुटुंबाची दाखल घेऊन समाज भगिनी जयश्री भामरे यांना अन्नपूर्णा योजनेनुसार दोन किराणा किट दिले व दरमहा 10 तारखेला नियमित किराणा देण्यात येईल याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. असे आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल परिसरातून सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.👏🏻

शब्दांकन :- संदीप शेंडगे 

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...