Wednesday, 11 May 2022

महापालिकेच्या विविध प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच !

महापालिकेच्या विविध प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच !


महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार 7/ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिमेतील सरोवर नगर येथील खाजगी जागेत चालू स्थितीत असलेले बांधकामधारक अजय खारे यांच्या तळ + 8 मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामवर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 4 कॉम्प्रेसर ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे 10/ई प्रभागातही सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व निळजे येथील सरकारी जमिनीवरील 4 चाळींच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली.  सदर कारवाई महापालिकेचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, तलाठी कार्यालयातील कर्मचारी, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 4 जेसीबी, 1 डंम्पर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


6/फ प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पूर्व 90 फुटी रोड वरील 40 टप-या व ढाब्यांवर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई अनधिकृत बाधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी , महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

4/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनीदेखील कल्याण पूर्व, वालधुनी परिसरातील 03 शेड्स व 02 टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई नुकतीच केली.

सौजन्य - KDMC फेसबुक पेज 

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...