Wednesday, 11 May 2022

शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन !

शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन !


प्रतिनिधी, गणेश नवगरे, । दि. १२ मे । मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या आमदाराच्या निधनानं मतदारसंघात देखील शोककळा पसरली आहे. ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ५२ वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती. गेल्या महिन्यात २१ एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता.

सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. 

या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली.
लटके यांनी १९९७ ते २०१२ अशा सलग ३ वेळा नगरसेवक पद भूषवलं. त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तीन वेळा नगरसेवक, सलग दोनदा आमदार अशी कारकीर्द होती.

१९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून आले. त्यानंतर सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
आमदार रमेश लटके यांनी तीन दिवसापूर्वी अंधेरी पूर्वेत होली फॅमिली ग्राउंड मध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमात मंत्री अनिल परब व मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते दुबईला आपल्या सहकुटुंब सोबत फिरायला गेले होते आणि काल दुबईमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...