Thursday, 19 May 2022

नाले सफाई कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश!

नाले सफाई कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश!


कल्याण, नारायण सुरोशी : महापालिका क्षेत्रात 95 किमी लांबीचे एकुण 97 नाले आहेत.पावसाळयापूर्वी  मोठया नाल्यातील व छोटे नाले/गटारातील  गाळ काढून ते स्वच्छ करणेबाबतच्या सुचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच महापालिकेच्या सर्व संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. 


या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आज महापालिका परिसरातील कल्याणमधील सांगळेवाडी पूलाजवळील जरीमरी नाला, कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोड जवळील लोकग्राम येथील नाला, खडेगोळवली नाला, त्याचप्रमाणे डोंबिवली येथील म्हसोबा चौकाजवळील खंबालपाडा नाला तसेच नांदीवली पूलाजवळील स्वामी विवेकानंद शाळेजवळील नाला या नाल्यांची पाहणी करुन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला.  सदर पाहणीच्या वेळी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता (जनि:) घन:श्याम नवांगुळ व इतर अभियंते उपस्थित होते.



आत्ता पर्यंत  सुमारे 30 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे नाल्यातून काढलेला गाळ सुकल्यानंतर त्वरीत उचलण्याची  कार्यवाही  करण्याच्या सुचना दिल्या असून उर्वरित कामे  31 मे 2022 पर्यंत  पूर्ण करण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले ,तसेच नाल्यातून काढलेल्या गाळाच्या परिमाणानुसारच संबधित अभिकरणास देयके अदा केली जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.


No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...