भातगावातील अपूर्ण पाखाडीचे काम पावसाळ्या आधी पूर्ण करा अन्यथा वृक्षरोपण आंदोलन करण्यात येईल मनसे शाखा अध्यक्ष : अविनाश वाघे यांनी दिला इशारा !
[ निवोशी / गुहागर - उदय दणदणे ] :
गुहागर तालुक्यातील भातगाव चाफेवाडी ते रोड ( अडी) ही पाखाडी सन २०१८ - १९ विकास कामांसाठी निधी मंजुरी मिळाली. काम चालू होऊन ही ते अद्याप अपूर्ण आहे. तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आल्याची दिनांक. १० मे २०२२ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. झालेल्या कामाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर भातगाव शाखा अध्यक्ष अविनाश वाघे यांच्याकडून दखल घेण्यात आली असून निर्मळ ग्रामपंचायत भातगाव सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे पत्र व्यवहार करून काम पूर्ण करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर (भातगाव) शाखा अध्यक्ष श्री अविनाश वाघे यांच्याकडून साकव आणि संरक्षण रेलिंग यांचे काम पूर्ण करण्यासाठी यांच्याकडून मागणी करण्यात आली असून जेणे करून शाळेतमध्ये जाणार्या शाळकरी मुलांना याचा त्रास होणार नाही व सदर साकव पूर्ण झाल्यास ग्रामस्थ जनतेला होणाऱ्या गैरसोयी पासून दिलासा मिळेल.
सदर अपूर्ण राहिलेली पाखाडी संरक्षण रेलिंग व साकव पाऊस सुरू होण्याआधी पूर्ण नाही झाल्यास भातगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदर वाटेवर वृक्षरोपण आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment