ऐतिहासिक कल्याण शहरात होणाऱ्या ठाणे जिल्हा पर्यटन महोत्सवाचे चौथे वर्ष !
समिती नियोजन बैठक सपन्न दहा दिवशीय भव्य महोत्सव - डॉ आदर्श भालेराव
कल्याण :- स्वतत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव निम्मित महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण - २०१६ अन्वये महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला, सांस्कृतिक महोत्सव समिती व हमराही फाऊंडेशन अंतरभरतीय शिक्षण संशोधन मंडळ (भारत सरकार) अंतर्गत ठाणे जिल्हा पर्यटन महोत्सव आयोजित ठाणे जिल्ह्यातील पर्यटना चालना मिळावी यासाठी ग्लोबल महाराष्ट्र पर्यटन महोत्सव ठाणे जिल्ह्यात चौथ्यांदा साजरा करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला, सांस्कृतिक महोत्सव समिती अध्यक्ष मा उमाजी बिसेन म्हणाले की, राज्यातील फारशी लोकप्रिय नसलेली ठिकाणे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश आहे. कोरोनाचा संकटकाळ अतिशय कठीण होता. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना पर्यटकांचे स्वागत करण्याकरीता महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला,सांस्कृतिक महोत्सव समिती
( Maharashtra state Tourism & Culture Festival Committee Maharashtra (India) तयारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भटकंती करण्याची संधी या महोत्सवातून उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्हा समजून घेता यावा या उद्देशाने पर्यटकांना महोत्सवात सामील होण्याचे आवाहन करत आहोत. ठाणे जिल्हा मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आणि ठाणे जिल्हा सौंदर्य या महोत्सवांतून पाहण्याची संधी यानिमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे.
या महोत्सवांचे आयोजन महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला, सांस्कृतिक महोत्सव समिती हमराही फाऊंडेशन कार्यालयांच्या वतीने स्थानिक जिल्हा कमिटीच्या मदतीने करण्यात येईल.
ठाणे जिल्हा पर्यटन आणि पर्यटन स्थळे :-
सुंदर तलाव, वन्यजीव ठिकाणे, ऐतिहासिक स्मारके, धार्मिक स्थळे आहेत आणि ठाण्याजवळ पिकनिक स्पॉट्स देखील आहेत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या आधुनिक महानगरांचे अन्वेषण करण्यासाठी सज्ज व्हा :-
१) तलाव पाली गणेशवाडी, ठाणे पश्चिम, २) सरगम वॉटर पार्क नागले, वसई पूर्व, ठाणे, ३) उपवन तलाव उपवन लेक रोड, पहिला आणि दुसरा पोखरण रोड, ठाणे पश्चिम, ठाणे, ४) वर्धमान कल्पनारम्य मनोरंजन पार्क, मॅकडोनाल्ड जवळ, शिवार गार्डन, मीरा रोड, ५) एल्विस बटरफ्लाय गार्डन गोवनिवाडा, ओवाळे, ठाणे, ६) तानसा धारण, ठाणे, ७) ओवळेकर वाडी बटरफ्लाय पार्क ओवाळा गाव, टकरदा रोड, घोडबंदर रोड, ठाणे, ८) ठाणे खाडी ठाणे, ९) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, १०) केळवा बीच पालघर, ठाणे, ११) घोडबंदर किल्ला घोडबंदर, मीरा भाईंदर, ठाणे, १२) येउर हिल्स ठाणे, १३) भिवंडी १४) कालीबाडी मंदिर ६४, वर्तक नगर, ठाणे पश्चिम, ठाणे, १५) सूरज वॉटर पार्क, ४२) डोंगरीपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे, १६) टिटवाळा गणेश मंदिर, १७) सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च जांबळी नाका एलबीएस मार्ग, जवळ, अहिल्यादेवी होळकर मार्ग, तलाव पाली, ठाणे पश्चिम, १८) कोपिनेश्वर मंदिर जांबळी नाका, ठाणे पश्चिम, ठाणे, १९) गोरखगड किल्ला मुरबाड, ठाणे, २०) कचराली तलाव पंच पाखडी, ठाणे पश्चिम, ठाणे, २१) कोरम मॉल ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, समता नगर, ठाणे पश्चिम, ठाणे, २२) तानसा वन्यजीव अभयारण्य तानसा, ठाणे, २३) मदर ऑफ व्हिक्टरी चर्च कोठारी कंपाऊंड, श्रीमती ग्लॅडीस अलवरेस रोड, मनपाडा, ठाणे पश्चिम, डी-मार्टच्या मागे, ठाणे, २४) तुंगारेश्वर धबधबा वसई (तुंगारेश्वर), ठाणे, २५) मुंब्रा, ठाणे, २६) वज्रेश्वरी भिवंडी, ठाणे, २७) माहुली किल्ला माहुली, ठाणे, २८) नाणेघाट डोंगर नाणेघाट, घाटघर,ठाणे, २९) अंब्रेश्वर शिव मंदिर शिव मंदिर रोड, कैलाश कॉलनी, पाइपलाइन रोड जवळ, अंबरनाथ, ठाणे, ३०) जय विलास पॅलेस, मुकणे कॉलनी, जव्हार, ठाणे, ३१) दुर्गाडी किल्ला कल्याण पश्चिम, ३२) शिवमंदीर खिडकाली डोंबिवली, ३३) हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, काळा तलाव, कल्याण(प) ३४) विठ्ठल मंदिर, शहाड, ३५) मलंगगड, अंबरनाथ ३६) कोंडेश्वर धबधबा, बदलापूर, ३७) मालशेजघाट, ३८) काळी मशीद कल्याण पश्चिम ३९) कल्याण जवळील लोणाडच्या गुहा व मंदिर ४०) बेहरे-खडवली अशी ठाणे जिल्ह्यात ४०) पर्यटन स्थळे आहेत याचे प्रदर्शन व संपूर्ण माहिती महोत्सवात दाखविण्यात येणार आहे, तलावांचा जिल्हा म्हणुन देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे. शहरात अनेक हिरव्यागार निसर्गरम्य टेकडया व डोंगर बघायला मिळतात.
अजिंठा बचतगट समूहाच्या उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शन करणाऱ्या 'अजिंठा प्रदर्शनाचे’ आयोजन मे महिन्यात कल्याण कचोरे येथे होणार आहे. त्याच कालावधीमध्ये ग्लोबल महाराष्ट्र राज्य महोत्सवाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना ग्लोबल महाराष्ट्र राज्य महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. आदर्श भालेराव यांनी संबंधित माहिती दिल्या.
📞 +91 80707 05552
ऐतिहासिक असणारे कल्याण शहरात असलेल्या BSUP कचोरे, कल्याण पुर्व परिसरात मे महिन्यात अजिंठा महिला बचत गट प्रदर्शन आणि ग्लोबल महाराष्ट्र राज्य भव्य महोत्सवाचे आयोजन केल्याने स्थानिकांना रोजगार संधी आणि व्यापक प्रसिद्धी मिळेल. या पाश्र्वभूमीवर बैठक आज संपन्न झाली. बैठक मध्ये भारत गायकवाड, मुस्ताक अन्सारी, शशीकांत वाघ, शशी खंडागळे, राहुल सावंत, विलास गायकवाड, सुवर्णा कानवडे, सहनाज खत्री, जितेंद्र ठोबळे, प्रदीप सोनवणे, संदेश ठोकळे, विजय गायकवाड, अरफात शेख याच्या उपस्थितीत बैठक पार पडली, त्या बैठकीत आयोजक अध्यक्ष डॉ. आदर्श भालेराव याची निवड करण्यात आली. दिनांक २७ मे ते ५ जून २०२२ पर्यत साय ४ ते १० पर्यत दहा दिवशीय महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
सदर महोत्सवात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना केंद्र-राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील वेगळ्या जातीच्या परंपरेचे जतन केले जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांना 'महाराष्ट्रातील 506 जातीची' संस्कृती कला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आवर्जून महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आयोजक डॉ. आदर्श भालेराव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment