श्रीलंके सारखी बिकट परिस्थिती भारतात येऊ शकते - खासदार संजय राऊत
मुंबई, संदीप शेंडगे : श्रीलंकेत सध्या अतिशय बिकट परिस्थिती असून बेरोजगारी महागाई वीजेचे संकट यांसारख्या गंभीर समस्यांनी नागरिक ग्रासले आहे.
महागाईने कळस गाठला असून येथील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. याच्या विरोधात श्रीलंकेमध्ये जनता रस्त्यावर उतरली असून तेथील खासदार आमदार यांच्या घरावर मोर्चे धरणे देत आहेत अनेकांनी आमदार खासदार यांची घरे पेटवून दिले आहेत अनेक आमदार खासदार राजकीय मंत्री हे भूमिगत झाले असून नागरिक त्यांचा शोध घेत आहे याच निष्क्रिय बेजबाबदार मंत्र्यांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे येथील नागरिकांना वाटत आहे.
अशीच परिस्थिती भारतामध्येही होऊ शकते पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले असून महागाईने भारतातील जनता अतिशय त्रस्त झाली आहे बेरोजगारीने कळस गाठला असून बेरोजगार तरुण परिस्थितीशी सामना करीत आहे अशीच परिस्थिती आणखीन काही दिवस सुरू राहिली तर भारतामध्ये सुद्धा श्रीलंके प्रमाणे जनता रस्त्यावर उतरून मंत्री खासदार आमदार यांची घरे पेटवतिल त्यांच्या घरांवर मोर्चे काढतील येथील आमदार खासदार यांना भूमिगत व्हावे लागेल असा गर्भित इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे त्यामुळे वेळीच केंद्र सरकारने सावध होऊन महागाई बेरोजगारी यावर तात्काळ उपाय शोधून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे आहे.
No comments:
Post a Comment