अखिल भारतीय शिंपी समाज मुंबई जिल्हाध्यक्षपदी किरण बाविस्कर यांची बिनविरोध निवड !
ठाणे ( मनिलाल शिंपी) : अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था मुंबई जिल्हा शिंपी समाजाची सभा दि.९ मे २०२२ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता "A/2,भाग्यवान सोसायटी, खारदेवनगर, 400071,. आचार्य मराठे कॉलेज जवळ, गोवंडी रोड चेंबूर (मुंबई)येथे जिल्हाध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांचां अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये नुतन राष्ट्रीय अध्यक्ष वनेशभाऊ खैरनार यांनी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी सन २०२२-२०२५ या कालावधीकरिता भांडूप येथील रहिवासी, उद्योजक किरणभाऊ बाविस्कर यांची नियुक्ति केली.
सदर नियुक्तिकरिता राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रबाबा बागुल, विश्वस्त विजयनाना बिरारि, सुनिलबापू निकुंभ, यांचे सहकार्य लाभले.
सभेला राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष दिलीपभाऊ कापडणे, सचिव संजय खैरनार, उपकार्याध्यक्ष विजय खैरनार, अ.भा.युवाध्यक्ष प्रमोद शिंपी, माजी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल भांडारकर, सल्लागार प्रभाकर निकुंभ, हिरालाल बोरसे ,प्रशांत जगताप, *भांडुप विभाग-* रवींद्र गवांदे, विजय कापुरे, किशोर चव्हाण, विनायक गवांदे, *घाटकोपर विभाग-* राजू जगताप, जितेंद्र शिंपी, *परेल विभाग-* बन्सीलाल शिंपी *विरार विभाग-* गोविंद भामरे, रामचंद्र सोनवणे, मुकुंद जगताप, मुकेश इसई, *बोरिवली विभाग-* संजय कापडणीस, राजेश वारुळे, *कुर्ला विभाग-* नरेश शिंपी, दगडुशेठ खैरनार, संजय गांगुर्डे, कैलाश बागुल, गणेश बोरसे, दिनेश सोनवणे इ. उपस्थित होते. सभेत मुंबई जिल्हा शिंपी समाजातर्फे *नुतन राष्ट्रीय अध्यक्ष श्री वनेशभाऊ खैरनार* व समाजमान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सुनिल भांडारकर यांची कन्या *कु.हर्षदा* हिने आस्ट्रेलिया येथे *Master Of Architect* कोर्स पूर्ण केल्याने समाज मान्यवरांनी तिचे अभिनंदन व सन्मान केला. नुतन मुंबई जिल्हाध्यक्ष *श्री किरणभाऊ बाविस्कर* यांनीं मुंबई जिल्हा सचिवपदी *रविद्रशेठ गवांदे* यांची नियुक्ति केली. नुतन पदाधिकारी यांचे समाजमान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले. सभेचे सुत्रसंचालन हिरालाल बोरसे यांनी केले. व नानासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.
शब्दांकन - संदीप शेंडगे
No comments:
Post a Comment