Thursday, 12 May 2022

प.पु.सद्गुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा "५१वा रौप्यमहोत्सवी" कार्यक्रम १६ मे रोजी होणार संपन्न !!

प.पु.सद्गुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा "५१वा रौप्यमहोत्सवी" कार्यक्रम १६ मे रोजी होणार संपन्न !!


[ निवोशी / गुहागर : उदय दणदणे ] :

प.पु.सद्गुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराज आध्यात्मिक सेवा केंद्र येथे सामाजिक सेवा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता बजावत असताना लाखो लोकांना व्यसनमुक्त करुन त्यांचे संसार सुखी- समाधानी केलेले आहेत.
   
 
आध्यात्मिक सेवा केंद्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबीर भरविणे, नेत्रदान तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर असे सामाजिक उपक्रमाबरोबरच अनेक राष्ट्रीय महापुरुषांचे  विचार व त्यांच्या कार्याचे प्रबोधन करुन अनेक रंजले गांजलेले, गोर-गरीब जनतेला विश्वास देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे कार्य स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांच्या मार्फत केले जाते. 

सद्गुरूंची उपशाखा -ओम स्वामी बाळ सत्यधारी महाराज  सेवा केंद्र उपशाखा- मुंबई मंडळ. अध्यक्ष : श्री. विलास भिकाजी घाणेकर यांच्या अध्यक्षते खाली महाराजांच्या उपस्थितीत व्यसन मुक्ती, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम, असे विविध कार्यक्रम मुंबई मध्ये दरवर्षी राबवले जातात. शाळेय विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभ कार्यक्रम आयोजित केले जाते. 

असे हे महंत थोर विचारांचे सत्यधारी महाराज यांचा ५१ वा रौप्य महोत्सवी कार्यक्रम सोमवार दिनांक.१६ मे २०२२ रोजी स्थळ-शीळ, मिरजोळे, (रामभोळ तळे) रानमाल शिळ, रत्नागिरी येथे संपन्न होत आहे. 
सदर रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तगण तसेच सर्व बंधु भगिनी यांनी या बहुमूल्य अश्या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घेऊन आपले जीवन सफल करा. महाराज सर्वजनांना सदोगतीचे मार्गदर्शन करतील, असे आवाहन मुबंई मंडळ, अध्यक्ष : श्री विलास घाणेकर, उपाध्यक्ष : श्री सुभाष बांबरकर, सचिव : श्री विनय पवार आणि मुंबई मंडळ कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...