Thursday, 12 May 2022

कल्याण पंचायत समितीच्या सदस्यांकडून बांधकाम विभागाची 'झाडाझडती ?

कल्याण पंचायत समितीच्या सदस्यांकडून बांधकाम विभागाची 'झाडाझडती ?


कल्याण, (संजय कांबळे) : काल झालेल्या कल्याण पंचायत समितीच्या मासिक बैठकीत बांधकाम विभागाने केलेल्या मनमानी खर्च व मागिल खर्चाची न दिलेली माहिती आणि या विरोधात विविध वृत्तपत्रातून आलेल्या बातम्या याची गंभीर दखल घेत सदस्यांनी बांधकाम विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली, त्यामुळे या विभागाची झाडाझडती आता सुरू झाली आहे.

कल्याण पंचायत समितीची धोकादायक इमारत पाडून तिच्या शेजारी असलेल्या बचतभवन इमारतीचे स्ट्रक्चर /प्लेअर याची दुरुस्ती करण्यात आली. यासाठी सुमारे ८६ लाखांच्या आसपास खर्च झाला होता. यावेळी इमारतीचा बहुतांश भाग दुरुस्त करण्यात आला होता. याला काही महिने होत नाही तोच पुन्हा दुरुस्ती च्या नावाखाली अडिज ते तीन लाख रुपयांची दुरुस्ती करण्यात आली आहे. इमारतीच्या खाली पार्किंग जवळ केलेला कोबा पाहिला असता या कामांचा 'दर्जा' लक्षात येतो,

या विरोधात पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रातून आवाज उठवला होता, काल कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात समिती सदस्यांची मासिक बैठक घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी हे बालकल्याण समितीची कमिटी आल्याने ते केडिएमसी मध्ये गेले होते. तसेच बांधकाम उप अभियंता देखील उपस्थित नव्हते, त्यामुळे ही सभा शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी व शाखा अभियंता श्री कुंभारे व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.

सभापती रेश्मा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती भरत भोईर यांच्या प्रमुख उपस्थितत पार पडलेल्या या सभेत माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे व रमेश बांगर यांनी बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले. इमारतीवरील मागील ८६ लाख रुपये खर्चाची अद्यापही माहिती सदस्यांना देण्यात आलेली नाही, तोपर्यंत पुन्हा अडीच ते तीन लाख रुपये खर्च कसा काय केला, याची आम्हाला कोणालाही माहिती देण्यात आली नाही, पेपरमध्ये आलेल्या बातम्यातून आम्हाला कळते, याचा अर्थ काय? असा खडा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी सदस्य रमेश बांगर देखील अधिक आक्रमक झाले होते. शाखा अभियंता श्री. कुंभारे कसेबसे विभागाची अब्रु सांभाळत होते. तरीही बहुतांश सदस्यांनी बांधकाम विभागाच्या खाबुगिरी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

तर भविष्यात बांधकाम विभागाचे पितळ उघडे पाडणार असे काही सदस्यांनी बोलून दाखविले, त्यामुळे कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची झाडाझडती सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...