ताजमहालच्या जागेची कागदपत्रे आमच्याकडे असल्याचा भाजापा महिला खासराचा दावा !!
भिवंडी, दिं,१२, अरुण पाटील (कोपर) :
ताजमहालवरून वाद सुरू असून ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडण्यात याव्यात, अशी मागणी हिंदू संघटना करत आहेत, यातून ताजमहालचे सत्य समोर येईल. भाजप खासदार दिया कुमारी यांनी दावा केला आहे की, ताजमहाल ज्या ठिकाणी बांधला आहे तो पूर्वी जयपूरच्या राजघराण्याचा महाल होता आणि शहाजहानने तो ताब्यात घेतला होता.
ताजमहाल वादावर भाजप खासदार दिया कुमारी म्हणाल्या की, आमच्याकडे असलेल्या कागदपत्रां नुसार त्या जमिनीवर एक राजवाडा होता आणि शाहजहानने त्यावर कब्जा केला होता कारण तो त्यावेळी राज्य करत होता. ही जमीन जयपूरच्या राजघराण्याची होती आणि ती आमच्या मालकीची असल्याचे कागदपत्रे आमच्याकडे आहेत.भाजप खासदार दिया कुमारी पुढे म्हणाल्या की, न्यायालयाने निर्देश दिल्यास आम्ही कागदपत्रे देऊ.’
दिया कुमारी यांनी ताजमहालच्या बंद खोल्या उघडण्याच्या मागणीचे समर्थन केले आणि सांगितले की, सध्याचे स्मारक बांधण्यापूर्वी तिथे काय होते याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. या संदर्भात जयपूर कुटुंबाकडे रेकॉर्ड उपलब्ध असून, गरज पडल्यास ती उपलब्ध करून दिली जाईल, असे त्या म्हणाले.
ताजमहालच्या बंद खोल्या उघडण्या संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा संदर्भ देत दिया कुमारी म्हणाल्या, ‘कोणीतरी आवाज उठवत याचिका दाखल केली हे चांगले आहे. त्यासाठी काही कागदपत्रे हवी असतील, तर ट्रस्टमध्ये आमच्याकडे पोथीखानाही आहे आणि जी काही कागदपत्रे असतील, न्यायालयाने आदेश दिल्यास. ती आम्ही पुरवू.
भाजप खासदार म्हणाल्या ‘लोकांना कळायला हवे की तिथे खोल्या का बंद आहेत? ताजमहालच्या आधी काहीही असेल, ते कदाचित मंदिर असेल. लोकांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी ‘समाधी’पूर्वी मूळ काय होते?’
No comments:
Post a Comment