Monday, 2 May 2022

कामगारांची स्थिती १८८६ पर्यंत मागे नेण्याचे सरकारचा प्रयत्न.. "मे दिनी आयोजित भाषणातील सूर"

कामगारांची स्थिती १८८६ पर्यंत मागे नेण्याचे सरकारचा प्रयत्न.. "मे दिनी आयोजित भाषणातील सूर" 


भुसावळ, बातमीदार.. येथील आयुध निर्माणी  कामगार युनियन द्वारा दोन वर्षे कोरोना काळानंतर या वर्षी १ मे जागतिक कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले,. सुरक्षेच्या कारणावरून सकाळी इस्टेट एरियात होणारी रैलीस पोलिस प्रशासनाने आयोजक यांना १४९ ची नोटीस दिलेने रद्द करण्यात आली. 


तथापि कामगार दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सकाळी ९ वा प्रथम लाल झेंड्याला सलामी, नंतर कामगार आंदोलनात शहीदांच्या प्रतीकात्मक स्मारकाला श्रद्धांजली, अर्पण करण्यात आल्यानंतर पदाधिकारी चा मेळावा घेण्यात कामगार युनियन अध्यक्ष काॅ. निलेश देशमुख व सहकारी यांचे पुढाकारात झालेल्या या कार्यक्रम साठी आयुध निर्माणी भुसावळ चे महाप्रबंधक श्री वसंत निमजे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते, त्यांचे सह फॅक्टरीचे उप- महाप्रबंधक श्री बी देविचांद तसेच एशियन गोल्ड मेडल विजेते मोहम्मद आरिफ व विशेष कॉ. सुरक्षा इन्चार्ज आर एस मेढे हेही मान्यवर अधिकारी तसेच विशेष मार्गदर्शक म्हणून राज्य आयटकचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष कामगार नेते काॅ. अमृतराव महाजन हे आवर्जून उपस्थित होते. कार्य क्रमाच्या सुरुवातीला आयुध निर्माणी बोर्ड चे जे सी एम श्री दिनेश राजगिरे यानी आपल्या प्रास्ताविकात कामगार दिनाच्या इतिहास थोडक्यात मांडून जुन्या पेंशन योजनेसाठी एकत्र येण्याचे व चार कामगार संहिता व खाजगीकरण धोरणाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. एससी एसटी ओबीसी संघाचे श्री राजू निकम यांनी संघटनांची बदलत चाललेली स्थिती, मागण्या व कार्यपद्धती बाबत मनोगत व्यक्त करतांना संसदेत आपले बाजू मांडणारेची संख्या वाढली तरच कामगारवर्ग वरचे हल्ले थांबतील असे आपल्या भाषणात विचार मांडले. 


या सभेत मार्गदर्शन करताना कामगार नेते कॉ. अमृतराव महाजन यांनी मे दिवसाचा इतिहास व सध्याचे सरकारचे कामगार धोरण मांडताना सांगितले की सरकार ने कामगारांनी गेली १०० वर्षापासून लढून मिळवलेले ४६ कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांना अनुकूल चार कामगार सहिता लादण्याचा प्रयत्न करत आहे व कामगार चळवळ १८८६ पर्यंत मागे रेटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे म्हणून शिकागो येथील कामगार  शहिदांचे स्मरण व त्यांच्या ध्येयाची प्रेरणा घेऊन आपली हक्काची लढाई सुरू ठेवली पाहिजे. असे प्रतिपादन केले. फॅक्टरीचे महानिबंधक श्री नीमजे यानीं आपल्या समारोप पर भाषणात कामगार दिनाच्या कामगारांना शुभेच्छा दिल्या व कामगारांनी एकजूट तर करावी व आपल्या फॅक्टरीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्याकडे ही लक्ष द्यावे असे आवाहन केले. 


कामगार दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष काॅ. निलेश देशमुख, उपाध्यक्ष काॅ. आशिष मोरे, कार्य चेअरमन को ऑप सोसायटी किशोर बढे, योगेश अंबोडकर सेक्रेटरी कार्यसमिति, खजिनदार संतोष बाविस्कर, मिलिंद ठोंबरे, प्रविण बोईत, रोशन चौधरी, राजू तडवी, नितीन देशमुख आदींनी परिश्रम घेतले.  *या कार्यक्रमात महानिबांधक निमजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व ३१ मे रोजी त्यांच्या होणाऱ्या सेवा निवृत्ती निमित्त कामगार व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचेसह मान्यवरांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला*

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...