Monday, 2 May 2022

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे, मला शांतता बिघडवायची नाही, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले गेलेत महाराष्ट्रात का नाही?-- राज ठाकरे

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे, मला शांतता बिघडवायची नाही, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले गेलेत महाराष्ट्रात का नाही?-- राज ठाकरे


भिवंडी, दिं,२, अरुण पाटील (कोपर) :
            भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही, तर हा समाजिक विषय आहे. मला शांतता बिघडवायची नाही, जर उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले गेलेत तर महाराष्ट्रात का नाही? तुम्ही जर भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावू. मशिदी बरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढा. पण मशिदी वरचे काढल्या नंतरच. पोलिसांची परवानगी घेऊन हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केले.
           या आधी पण लाऊड स्पीकरवर बोललो, अनेक जण बोलले, मी फक्त पर्याय दिला. आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगीतले.
हे सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, त्यांना प्रेमाने विनंती करून जर समजत नसेल तर एकदाचे होऊन जाऊ द्या, महाराष्ट्रातील मनगटा मध्ये किती ताकत आहे ते त्यांना दाखवून द्यायला लागेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
          छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. झाला अन महाराष्ट्राचे दार उघडले. छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती नसून एक विचार आहे. त्यांनी महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा लवला. पवार साहेबांनी कधीही भाषणात  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीय द्वेष वाढला असे राज ठाकरे यांनी सांगितले.
         माझे आजोबा भट भिक्षूकीच्या विरोधात होते, मात्र आस्तिक होते. पवार त्यांच्या कामापुरते पुस्तक वाचतात. त्यांनी पूर्ण पुस्तक वाचले असते तर कळले असते. आता नाटक करत आहेत. नास्तिक आहे म्हणले की त्यांना लागले, आणि पूजा करतानाचे फोटो काढले. त्यांचीच मुलगी लोकसभेत म्हणते की "माझे वडील नास्तिक आहेत. अजून काय पुरावा हवा, असा घणाघात राज ठाकरे यांनी शरद पवार यंच्यावर केला.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...