लालबावटा शेतमजूर युनियन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २० मे रोजी राज्यभर आंदोलने.. 'जळगाव जिल्ह्यातही १९ मे ते २२ मे कालात आंदोलने होणार'
चोपडा, बातमीदार.. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची राज्य कौन्सिल बैठक नुकतीच अमरावती येथे युनियनचे राज्य अध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस कॉ. शिवकुमार गणवीर तसेच भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या उपस्थितीत दिनांक २६ एप्रिल रोजी अमरावतीत झाली. त्या बैठकीतील निर्णय नुसार.... येत्या २० मे रोजी राज्यभर शेतमजुरांची रोजगार- वान गायरान जमीन-घरबांधणीसाठी ३ लाख रु अनुदान मिळणे, तसेच ज्यांची घर बांधली जात आहेत. त्यांच्या घराचे रखडलेल्या हप्त्यांचे पैसे मिळावेत. राहण्यासाठी जागा मिळावी राहत असलेली जागा नावावर करावी. व निवारा बांधून द्यावा , १४ जीवनावश्यक वस्तू, कामगार कुटुंबाच्या रेशन कार्ड वाटप सुरु करा. किमान तीन हजार रुपये मानधन श्रावणबाळ संजय गांधी इंदिरा गांधी योजना आदीमार्फत मिळावेत, कुटुंब अर्थसाह्य नॉन बी पि एल, बीपीएल महिलांना मिळावे उत्पंनाची अट १ लाख असावी या प्रश्न बरोबर..
पेन्शनप्रश्र्नी आंदोलन.. तसेच रोजगार हमीची कामं शहरातही मिळावीत आदी मागण्यांसाठी २० मे रोजी राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांवर आंदोलने मोर्चे आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
तसेच येत्या १३ जून रोजी : मुंबईत राज्यव्यापी बैठक व मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे.
*येत्या २६ जून रोजी : बीड येथे वनजमीन, जंगल, गायरान हक्क परिषद आयोजित करणे येणार* या सर्व निर्णय बरोबर येत्या १६ मे रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असून देशातील सर्व शेतमजूर संघटना एकत्र येणार आहेत *तेथून देशभर आंदोलन सुरू करण्याची हाक दिली जाणार आहे*
*या बैठकीत औरंगाबादेतील मनीष आव्हाड या मातंग युवकाच्या खूनाचा तीव्र निषेध निषेध करण्यात आला पोलीस खात्याला आवाहन करण्यात आले की, कोणत्याही पक्षाच्या दबावास बळी न पडता आरोपींना अटक करा. शासनाने मृताच्या पत्नीस तातडीची आर्थिक मदत द्यावी, नोकरी, व घर देण्याची व दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी* करण्यात आली आहे झालेल्या निर्णयानुसार जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय चोपडा अमळनेर जळगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून त्या आंदोलनाची तयारी सर्वश्री कॉम्रेड अमृत महाजन लक्ष्मण शिंदे, वाल्मीक महिराळे, निर्मला शिंदे, सुखदेव व्हील, सुरसिंग भिल, हिराबाई सोनवणे, प्रेम सिंग, बारेला, अरमान तडवी, जिजाबाई राणी, बळीराम धीवर, बाळू लोहार, गुरुदास मोरे, किशोर पाटील, संगीता पाटील, गणेश माळी, वासुदेव कोळी, पंडित महाजन, भिका महाजन, रेखा भालेराव, शांताराम पाटील, बाळू कोळी, रेखा पाटील, विश्वास पाटील, एकनाथ पाटील, ताराबाई भील, इरफान मण्यार, ताराबाई हेमाडे, चंद्रकांत माळी, अंबा लाल राजपूत, तमाशा पावरा, किशोर भिल्ल, आनंदा भील, आदी करीत आहेत असे लाल बावटा शेतमजूर युनियन ने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment