कल्याण पश्चिम येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिर संपन्न !!
कल्याण, वैष्णवी माळी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दिनांक २ मे रोजी प्रभागातील सर्व नागरिकांकरिता मोफत शस्त्रक्रिया, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप याचे आयोजन सौरभ गणात्रा व विकी गणात्रा यांच्या जनसंपर्क कार्यालय, सुंदर नगर गजानन महाराज मंदिर जवळ, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षापासून नागरिकांना आरोग्य विषयी अनेक समस्या उद्भवल्या आहेत. या अनुषंगाने सौरभ गणात्रा व विकी गणात्रा यांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरात ॲन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी, बायपास सर्जरी, टू डी इको, वॉल रिप्लेसमेंट, फॅक्चर जॉइंट, एस. एल. रिपेअर, प्रोस्टेट सर्जरी अशा अनेक सर्जरी मोफत करण्यात आल्या. तसेच सामान्य चाचणी, मधुमेह, आरबीएस, रक्तदाब, ईसीजी, पल्स, ब्लड प्रेशर, ए पी झिरो टू, ऑक्सिजन लेवल, डोळे तपासणी, व मोफत चष्मे वाटप तसेच मोफत औषधे वाटप यावेळी नागरिकांसाठी ठेवण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेविका वैशाली पाटील, निता देसले व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment