Wednesday, 4 May 2022

इंडियन आयडॉल संतोष जोंधळे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमासाठी मोहने शहरातील नागरिक व युवावर्ग सज्ज !! *इंडियन आयडॉल रॉकस्टार प्रत्यक्ष बघण्यासाठी युवा मुला-मुलींमध्ये उत्साह संचारला*

इंडियन आयडॉल संतोष जोंधळे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमासाठी मोहने शहरातील नागरिक व युवावर्ग सज्ज !!

*इंडियन आयडॉल रॉकस्टार प्रत्यक्ष बघण्यासाठी युवा मुला-मुलींमध्ये उत्साह संचारला*


कल्याण, संदीप शेंडगे : इंडियन आयडॉल गोल्डन तिकीट विनर स्टार प्रवाह टिव्ही चैनल, मी होणार सुपरस्टार कार्यक्रमातील रॉकस्टार संतोष जोंधळे (नाशिक) यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार ऑर्केस्ट्रा गुरुवारी ५ मे रोजी मोहने येथील काशिनाथ तेरे मार्केट गालेगांव येथे होत असून या कार्यक्रमासाठी संपूर्ण मोहने शहरातील युवावर्ग सज्ज झाला आहे. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या माध्यमातून बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका शितल महेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष सुशील आरके, स्वागत अध्यक्ष दादासाहेब निकाळजे सरचिटणीस बी.एफ. वाघमारे, कार्याध्यक्ष दिनेश जाधव, कोषाध्यक्ष डी.जे. वाघमारे, आनंद शेंडगे, सचिव राजेश मोरे, संघटक आनंद सोनवणे, संदीप शेंडगे, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


नाशिक येथील झोपडपट्टीत राहणारा हमालाचा मुलगा म्हणून ओळख असलेला संतोष ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर गायन क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करुन आपल्या आवाजाने प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल आणि उपस्थित सर्वच जजला अचंबित करून आपल्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केल्याने त्याची अल्पावधीतच एक युवा रॉकस्टार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 


हमालाचा मुलगा हमालच होणार हा कसला गायक होणार असे बोलणाऱ्या लोकांना तोंडात बोटे घालायला लावणारा संतोष आज झी मराठी, स्टार प्रवाह टीव्ही चॅनल सोनी मराठी वर सुरू असलेल्या इंडियन आयडॉल या मालिकेतील गोल्डन टिकीट विनर म्हणून ख्याती मिळवली आहे. युवा वर्गामध्ये तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये रॉकस्टार म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 

खंडोबारायाच याड बाई लागल मुरळीला हे प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचं गाणं हुबे हुब गायल्याने अजय-अतुल यांनी सुद्धा त्याचे खूप कौतुक केले होते तसेच महाराची तलवार, तुझ्या बंगल्याला जाळायच काय, जय भीम वाला झुकेगा नही साला, उतरले महाराचे, गावा मधे गाव आहे, महू गाव तिथे जन्मले भीमराव सखे बाई ग या व अशा असंख्य गाण्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या तसेच भिम अनुयायामध्ये प्रचंड क्रेझ असलेला गायक मोहने नगरीत येत असल्याने युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळेचे बंधन असल्याने कार्यक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणणे शहराध्यक्ष माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...