Wednesday, 4 May 2022

जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव उत्साहात साजरा !

जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव उत्साहात साजरा !


बुलडाणा, बातमीदार : जिल्हा परिषदेला १ मे २०२२ रोजी ६० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हिरक महोत्सव समारंभ १ मे रोजी जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा नियोजन समिती सदस्य जालींधर बुधवत, धृपदराव सावळे, बाळा भोंडे, डि. एस लहाने, डॉ. ज्योती खेडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. वसंतराव नाईक यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रदीप इंगळे, श्रीमती रश्मी जाधव यांचे चमुने महाराष्ट्र गीत सादर केले.  
  अध्यक्षीय भाषणामध्ये पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा परिषदेचा मागोवा घेतला. यापुढे शिक्षण व आरोग्य या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा. धर्मरत्न वायवळ उपस्थित होते. त्यांनी जिल्हा परिषदेसमोरील आव्हाने या विषयावर आपले विचार मांडले. तर धृपदराव सावळे यांनी जिल्हा परिषदेच्या मागील ६० वर्षाचा मागोवा घेतला. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण मोहोड यांनी केले. 
 

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...