Tuesday, 10 May 2022

मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्टीत ६२६ विशेष ट्रेनची घोषणा !

मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्टीत ६२६ विशेष ट्रेनची घोषणा !


मुंबई, बातमीदार : कोरोना विषाणू महामारीनंतर यावर्षी सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये अनेक लोक प्रवासासाठी बाहेर पडले आहेत. 

उन्हाळ्याच्या सुट्टी साजऱा करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून दर वर्षी उन्हाळी विशेष ट्रेन चालविल्या जातात. यंदा सुद्धा प्रवाशांचा सुविधेसाठी मध्य रेल्वेने आपल्या विद्यमान गाड्यांव्यतिरिक्त ६२६ विशेष ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एप्रिल ते जून २०२२ मध्ये या ६२६ उन्हाळी विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई / दादर / लोकमान्य टिळक टर्मिनस / पनवेल / पुणे / नागपूर / साईनगर शिर्डी सारख्या मध्य रेल्वेतील स्टेशन पासून विविध गंतव्यस्थानाकरीता चालविण्यात येत आहेत.

अशी आहे संख्या -

* लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस तसेच थिवि दरम्यान ३०६ उन्हाळ्यातील विशेष ट्रेन. 

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाऊन तसेच रिवा दरम्यान उन्हाळ्यातील २१८ विशेष ट्रेन. 

* पुणे आणि करमळी, जयपूर दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन तसेच कानपूर सेंट्रल दरम्यान उन्हाळ्यात १०० विशेष ट्रेन. 

* नागपूर आणि मडगाव दरम्यान उन्हाळ्यातील २० विशेष ट्रेन. 

* साईनगर शिर्डी आणि ढहर का बालाजी दरम्यान उन्हाळ्यातील २० विशेष ट्रेन.पनवेल आणि करमळी दरम्यान उन्हाळ्यातील १८ विशेष ट्रेन. 

* दादर आणि मडगाव दरम्यान उन्हाळ्यातील ६ विशेष ट्रेन. 

* लातूर आणि बिदर दरम्यान उन्हाळ्यातील २ विशेष ट्रेन.

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...