Tuesday, 10 May 2022

महापालिकेच्या प्रभाग स्तरावर छोटे नाले, अंतर्गत गटारे साफसफाई करण्याची कार्यवाही सुरु !

महापालिकेच्या प्रभाग स्तरावर छोटे नाले, अंतर्गत गटारे साफसफाई करण्याची कार्यवाही सुरु !


पावसाळयात अतिवृष्टीच्या काळात छोटे नाले,गटारे यामध्ये पाणी तुंबून रस्त्यावर पाणी साचुन नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्तांना त्यांच्या अधिनस्त सफाई कर्मचा-यांकडून प्रभागातील छोटे नाले, गटारे यांची वेळोवेळी साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने आज 3/क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी स्वच्छता अधिकारी योगेश जगताप, आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे, दत्ताराम सावंत व भिमदास यांच्या पथकासह कल्याण स्टेशन परिसरातील व शिंदे मळा येथील गटार व चेंबर्समधील गाळ काढून साफ केला. त्याचप्रमाणे जयभीम नगर, बिर्ला कॉलेज परिसरातील गटारांमधील गाळ काढून साफ करण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच विकास हॉटेल ते रुक्मिणीबाई रुग्णालय, महात्मा फुले चौकातील गटारे,सांगळे वाडी, चौधरी मोहल्ला, घेलादेवजी चौक, वल्लीपीर रोड ते कृष्णा टॉकिज,मल्हार नगर, गणेश कृपा चाळ ते दिपलक्ष्मी बिल्डींग या परिसरातील देखील अंतर्गत गटारे साफ करण्याची कार्यवाही करण्यात आली.


त्याप्रमाणे 5/ड प्रभागातही प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी आरोग्य निरिक्षक तरे, ठाकरे, निकुंभ यांच्या पथकासह 5/ड प्रभाग परिसरातील गटारामधील चोकअप काढून गटारे साफसफाई करण्याची कार्यवाही केली.

सौजन्य - KDMC 

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...