Wednesday, 11 May 2022

उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबई कार्यालयाच्या निर्णयाला कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांचा विरोध, अन्य राज्यात का नाही?

उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबई कार्यालयाच्या निर्णयाला कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांचा विरोध, अन्य राज्यात का नाही?


भिवंडी, दिं,११, अरुण पाटील (कोपर) :
          मुंबईत राहणा-या उत्तर भारतीय नागरिकांच्या सुविधांसाठी मुंंबईमध्ये उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्वतुळात उमटण्यास सुरवात झाली आहे. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णायाला विरोध केला आहे.
आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना विचारात घेऊनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना सचिन सावंत म्हणाले की देशातील अन्य राज्यांत का नाही? असा सवाल उपस्थित करून या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशातील असंघटीत कामगार आहेत असे सांगण्यात आले आहे.
         देशातील गुजरात, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं कार्यालय उघडण्याचा निर्णय का? घेतला नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. देशात दरडोई उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे असंघटीत मजूर स्थलांतरीत होत आहेत. या मजुरांना उत्तर प्रदेश सरकारनं कोरोनाच्या काळात वा-यावर सोडलं होतं. मग आता अचानक त्यांची आठवण का झाली ? असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.
         उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मुंंबईत राहणा-या उत्तर प्रदेशाच्या नागरिकांसाठी मुंबईत कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यालय मुंबईतील असंघटीत उत्तर भारतीय लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल. अश्या प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
          दुस-या राज्यात असलेल्या नागरिकांसाठी त्या राज्यात कार्यालय सुरू करणारं उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे. मुंबईत सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय नागरीक राहतात. ही आगामी मुंबई महानगर पालीकेच्या निवडणुकीक निर्णायक ठरणारी व्होट बॅंक आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...