जळगाव जिल्हा किसान सभा अधिवेशन १३ मे रोजी चोपडा येथे होणार !
चोपडा, बातमीदार.. येथे.नगर वाचन मंदिर गांधी चौक १३/५/२२ शुक्रवार रोजी. सकाळी ११.०० वाजता आखिल भारतीय किसान सभा चे जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले. अशी माहिती किसान सभा ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ११ एप्रिल १९३६ रोजी शेतकऱ्यांचे शोषण विरुद्ध आणि शेतीमालाला भाव मिळावा व ज्याच्या हाती नागरा चट्टा त्यालाच जमिनीचा पट्टा.. सावकारी जुलूम बंद करा अशा मूलभूत मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील मोठे जमीनदार माजी खासदार डॉ. झेड ए अहमद कॉ सहजानंद इंदुलाल यादनिक यांनी स्थापना केली. या किसान सभेचे २८/ २९ मे २२ रोजी शिरपूर येथे राज्य अधिवेशन होणार आहे म्हणून तयारी साठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,
पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांची बाजारपेठेतील लुबाडणूक तसेच खते बियाणे, औषधे, साहित्य दरवाढ, त्यातच वन्य प्राण्यांचा त्रास दुसरीकडे दुष्काळ अवर्षण वादळी पाऊस त्यामुळे शेती परवडत नाही. सत्ताधारी मोदी सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आणि कार्पोरेट धार्जिणे धोरणे मुळे शोषण होत आहे, त्या सर्व प्रश्नावर अधिवेशनात चर्चा होणार आहे.
अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री शिवाजी दौलत पाटील, हे राहणार असून उद्घाटक... व मार्गदर्शक :-
*कॉम्रेड हिरालाल परदेशी सचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा
*का अमृत महाजन राज्य कौसिल सभासद भा क प *कॉम्रेड लक्ष्मण शिंदे जिल्हा सचिव भा क प तसेच
निमंत्रित.. श्री नानाभाऊ महाजन जिल्हा परिषद सदस्य, कॉ. शांताराम पाटील, धुळे जिल्हा किसान सभा चे उपाध्यक्ष, अर्जुंदादा कोळी हे हजर राहणार आहेत,
स्वागताध्यक्ष... किसान सभा संघटक हिम्मतराव महाजन (एरंडोल) हे असून, अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठराव केले जाणार आहेत तसेच पुढील तीन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. तरी या अधिवेशनास जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी यांनी हजर राहावे असे आवाहन *कॉम्रेड बाळू निंबा पाटील, अंबालाल राजपूत, जिया उद्दिनकाझी, मनोहर चौधरी, पुंडलिक राजपूत, धोंडू पाटील, संजय पाटील, कैलास पाटील, प्रल्हाद पाडवी, बाबुराव बुटा पावरा, प्रेमसिंग बारेला, चंद्रकांत माळी, सुकलाल कोळी पांडुरंग पाटील, गणेश धनगर, विश्वास,धनगर, उत्तम महाजन, जयंत महाजन, माजी सरपंच डि आर पाटील, उमर्दे, प्रकाश पाटील, दिलीप चौधरी, गंभीर महाजन, विष्णू चव्हान, वासुदेव कोळी, छोटू पाटील, पांडू पाटील, योगराज पाटील आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment