जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई यांच्या माध्यमातून आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना ""समाज भूषण पुरस्कार"" देऊन सन्मानित करण्यात आले !
मुंबई, बातमीदार : जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई यांच्या तिसऱ्या वर्धमान दिनानिमित्ताने जागृत सामाजिक संस्था राज्यस्तरीय पुरस्कार 15 मे 2022 मा. श्री. नामदार अस्लम शेख ( मुंबई पालकमंत्री ) यांच्या उपस्थितीत मा. अमोल भालेराव ( जागृत महाराष्ट्र न्यूज. मुंबई. संचालक ) मा. शंकरराव बोरकर ( उद्योगपती ) यांच्या हातून आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आपण समाजाच्या राष्ट्राच्या एक जबाबदार घटक असून समाज ऋण राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे.
सूर्याचे तेज आहे, तुमच्या कर्तुत्वात.!
चंद्राची शीतलता बहरते, आपल्या स्वभावात!
कस्तुरीचा सुगंध दरवळतो सामाजिक क्षेत्रात !
ज्याला श्रद्धा नेहमीच ज्ञान देते नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. त्या व्यक्तीला समाजरुपी ईश्वर मंदिरात नेहमीच लोक सन्मान मिळतो.
समाजातील गोरगरिबांच्या मन जपणारे श्री जितेंद्र पाटील साहेब सुधारक आहात. आपण जन्मभूमीचे ऋण फेडणारे योध्दे आहात. आपण सर्वांच्या हितासाठी अहोरात्र झटतात. सामाजिक क्षेत्रातील शिखर तुम्ही गाठलात. आपल्या अमूल्य सहकार्यामुळे अनेकांचे संसार थाटलात. जनसामान्यांच्या आशीर्वाद तुम्हावर आहे. आपल्या सेवेतील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
अशा शब्दांत उपस्थितांनी जितेंद्र पाटील यांना दिल्या शुभेच्छा..
सेवा परमो धर्म हीच ईश्वर सेवा हे ब्रीद असलेले : लोकसेवेचा आवरीत वारसा जोपासणारे...
सन्मानीय श्री जितेंद्र केवलसिंग पाटील
अध्यक्ष, आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन
📞 +91 99702 19877
आतापर्यंत जितेंद्र पाटील यांनी रक्तदान, आरोग्य शिबिर, जनजागृती रुग्णवाहिका सेवा, आश्रम शाळेतील मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण अपंगांना जयपूर फूट. कॅलिपर, सायकल ; कोरोना काळात रस्त्यावर राहणारे. बेवारस लोकांसाठी, बेरोजगार हातावर पोट भरणारे मदतीला धावणारे, धुणी-भांडी करणारे हात मजूर यांना स्वखर्चाने घरोघरी जाऊन जेवण देण्याचे व आरोग्य तपासणी महान कार्य केले.
लॉक डाऊन मधे जनता कर्फ्यू व कडक निर्बंध लावल्यावर या संकट समयी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली, गरीब कामगार तसेच गरजु मास्क व सॅनिटायझर औषधाचे फवारणीचे कामकाज केले.
आज जितेंद्र पाटील यांना त्यांच्या कार्यामुळे ४ आंतरराष्ट्रीय आणि १३२ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
No comments:
Post a Comment